आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरण:शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनाविरोधात एकत्र आले नेटकरी, ट्विटरवर ट्रेंड  झाले #NoBailOnlyJail

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूजर्सनी आर्यनच्या जामिनाविरोधात आवाज उठवत ट्विटरवर #NoBailOnlyJail ट्रेंड केला आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 6 दिवसांपासून तुरुंगात आहे. मुंबईहून गोव्याला जाणा-या कार्डिएला क्रूझवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीमधून आर्यनला ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. किल्ला न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. पण या दरम्यान, सोशल मीडिया यूजर्सनी आर्यनच्या जामिनाविरोधात आवाज उठवत ट्विटरवर #NoBailOnlyJail ट्रेंड केला आहे.

या ट्रेंडला पाठिंबा देत, एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, 'व्हीआयपी संस्कृती आता थांबली पाहिजे, शाहरुख खान एखादा संत नाही'. दुसरीकडे, आणखी एका यूजरने लिहिले, 'जर त्याला जामीन मिळाला तर तो इतर ड्रग पेडलरना प्रोत्साहित करेल जे आपल्या समाजासाठी धोकादायक आहे. प्रत्येक ड्रग व्यसनी तुरुंगात असावा जेणेकरून आपल्या समाजातून ड्रग कल्चर पूर्णपणे संपुष्टात येईल. ड्रगवुडने हॉलिवूडमधून काहीतरी शिकले पाहिजे.'

एका यूजरने लिहिले, 'सामान्य माणसासाठी आणि स्टार किडसाठी समान शिक्षा असायला हवी. सेलिब्रिटींना कोणतेही विशेषाधिकार मिळणार नाहीत, हा नवीन भारत आहे. मी या ट्रेंडचे समर्थन करतो.' एकाने लिहिले, 'सरकारने यातून एक उदाहरण मांडले पाहिजे.'

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शाहरुख खान आणि सतीश मानेशिंदे यांच्यासह 2002 मध्ये हिट अँड रन प्रकरणातून सलमान खानची निर्दोष मुक्तता करणारे वकील अमित देसाई यांची नियुक्ती केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे म्हणणे आहे की, आर्यनजवळ अमली पदार्थ सापडले नसले तरी तो या प्रकरणात पूर्णपणे सामील आहे.

बातम्या आणखी आहेत...