आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नोरा फतेही चित्रपटात काम करण्यासाठी कॅनडातून भारतात आली आहे. आज तिला स्पेशल आयटम साँगसाठी ओळखले जाते. 'दिलबर' आणि 'हाय समर' यासारख्या गाण्यांमध्ये जबरदस्त डान्स मुव्स दाखवणा-या नोरा फतेहीने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील तिच्या संघर्षाबद्दल सांगितले. भूतकाळातील आठवण सांगताना तिचे डोळे पाणावले होते. तिच्या मते, जेव्हा ती भारतात आली तेव्हा तिला एवढी वाईट वागणूक दिली जाईल याची कल्पनाही तिने कधी केली नव्हती. तिने सांगितले की, येथे लोक फक्त तोंडावर तिची चेष्टाच करत नव्हते, तर तिचा पासपोर्टदेखील लोकांनी चोरला होता.
दुबईचा यू ट्यूबर अनस बुखाशीसोबत बोलताना नोरा म्हणाली, "मी खूप उत्साही होते, पण माझ्याकडे अनुभवाची कमतरता होती. जेव्हा मी भारतात आले तेव्हा मी जसा विचार केला होता, तसे मुळीच काही नव्हते. मी विचार केला होता की, मला लिमोझीन गाडी घ्यायला येईल, एका सुइटमध्ये मला थांबवले जाईल आणि मी ऑडिशनला जाईन. मात्र प्रत्यक्षाच असं काही नव्हतं खिल्ली उडवणे, रिजेक्ट होणे, अतिशय वाईट अनुभवतातून मी गेले होते."
पुढे नोरा म्हणाली, 'भारतात आल्यानंतर मला आठ ते नऊ मुलींसोबत राहावे लागले होते. त्यांनी माझा पासपोर्ट चोरला होता एवढे घडल्यानंतर मला परतायचे नव्हते.'
कास्टिंग डायरेक्टरने सर्वांसमोर केला होता अपमान
नोरा इंडस्ट्रीतील एक कटू अनुभव सांगताना म्हणाली, 'दिग्दर्शिका माझ्यावर भडकली आणि मोठ्याने ओरडली होती. तुझ्यात काही प्रतिभा नसल्याचे तिने मला सुनावले होते. तिने अपमान करुन मला तिथून बाहेर जाण्यास सांगितले होते. त्यानंतर मी घरी येऊन खूप रडले होते. त्यामुळे निराश होऊन मी परत कॅनडा जाण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेमुळे मी खूप खचले होते. मात्र या प्रसंगामधूनच मला लढत राहण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर मेहनत करून पुढे जाण्याचे मी ठरवले,” अशी आठवण नोराने सांगितली.
2014 पासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे नोरा फतेही
नोरा मूळची मोरोक्को, कॅनडाची आहे. 2014 मध्ये रिलीज झालेल्या ‘रोर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर तिने 'बाहुबली: द बिगनिंग' यासह काही हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये स्पेशल अपिअरन्स दिला होता. बाहुबली या चित्रपटातील 'मनोहरी' मध्ये ती दिसली होती. मात्र, 'बिग बॉस 9' या रिअॅलिटी शोमधून तिला खरी ओळख मिळाली होती. या शोमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार नोरा
नोरा शेवटची मोठ्या पडद्यावर 'स्ट्रीट डांसर 3 डी' या चित्रपटात दिसली होती. रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. नोराने या चित्रपटात अभिनेत्रीचे पात्र वठवले होते. या चित्रपटातील 'गर्मी' या गाण्यातील तिच्या नृत्याचीही प्रशंसा झाली. अजय देवगण स्टारर 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात ती झळकणार आहे. हा चित्रपट यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.