आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोराचा इंडस्ट्रीतील कटू अनुभव:नोरा फतेहीने बॉलिवूड इंडस्ट्री सोडण्याचा केला होता विचार,  म्हणाली -'दिग्दर्शिकेने सांगितले होते माझ्यात टॅलेंट नाही’

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोराने करीना कपूरच्या चॅट शो ‘व्हाट वुमन वाँट’मध्ये आपला अनुभव सांगितला.

नोरा फतेही चित्रपटात काम करण्यासाठी कॅनडातून भारतात आली आहे. आज तिला स्पेशल आयटम साँगसाठी ओळखले जाते. मात्र सुरुवातीच्या काळात एका कास्टिंग डायरेक्टरच्या वाईट वागणुकीमुळे तिने इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता. ही बाब तिने करीना कपूरच्या चॅट शो ‘व्हाट वुमन वाँट’मध्ये उघड केली आहे.

  • बॉलिवूड प्रवासाबद्दल नोरा म्हणाली...

या शोमध्ये नोराने आपल्या बॉलिवूडमधील प्रवासासंदर्भात सांगितले. या क्षेत्रात भारतामध्ये कोणीही ओळखीचे नसताना येथे येऊन कशाप्रकारे स्ट्रगल करावा लागला आणि कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले यासंदर्भात नोरा बोलली.

नोरा इंडस्ट्रीतील एक कटू अनुभव सांगताना म्हणाली, 'दिग्दर्शिका माझ्यावर भडकली आणि मोठ्याने ओरडली होती. तुझ्यात काही प्रतिभा नसल्याचे तिने मला सुनावले होते. तिने अपमान करुन मला तिथून बाहेर जाण्यास सांगितले होते. त्यानंतर मी घरी येऊन खूप रडले होते. त्यामुळे निराश होऊन मी परत कॅनडा जाण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेमुळे मी खूप खचले होते. मात्र या प्रसंगामधूनच मला लढत राहण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर मेहनत करून पुढे जाण्याचे मी ठरवले,” अशी आठवण नोराने सांगितली.

  • 2014 पासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे नोरा फतेही

नोरा मूळची मोरोक्को, कॅनडाची आहे. 2014 मध्ये रिलीज झालेल्या ‘रोर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर तिने 'बाहुबली: द बिगनिंग' यासह काही हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये स्पेशल अपिअरन्स दिला होता. बाहुबली या चित्रपटातील 'मनोहरी' मध्ये ती दिसली होती. मात्र, 'बिग बॉस 9' या रिअॅलिटी शोमधून तिला खरी ओळख मिळाली होती. या शोमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

  • 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार नोरा

नोरा शेवटची मोठ्या पडद्यावर 'स्ट्रीट डांसर 3 डी' या चित्रपटात दिसली होती. रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. नोराने या चित्रपटात अभिनेत्रीचे पात्र वठवले होते. या चित्रपटातील 'गर्मी' या गाण्यातील तिच्या नृत्याचीही प्रशंसा झाली. अजय देवगण स्टारर 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात ती झळकणार आहे. हा चित्रपट यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.

बातम्या आणखी आहेत...