आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोरा फतेहीकडून भारतीय तिरंग्याचा अपमान:जाणून घ्या FIFA वर्ल्ड कपच्या मंचावर काय घडले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिचा अलीकडेच फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये फिफा फॅनफेस्टमध्ये परफॉर्मन्स झाला. एकीकडे नोराच्या डान्सचे कौतुक होत असताना दुसरीकडे नेटक-यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. डान्स परफॉर्मन्सनंतर नोरा फतेहीने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. पण यावेळी तिच्याकडून एक चूक झाली. ज्यावर नेटकरी तिच्यावर टीका करताना दिसत आहेत.

सध्या कतारमध्ये फिफाचा थरार रंगला आहे. जगभरातील फुटबॉलप्रेमी कतारमध्ये सामने पहायला आले आहेत. नोराने फिफा फॅन फेस्टिव्हलमध्ये 'ओ साकी साकी' आणि 'नाच मेरी रानी' या गाण्यावर परफॉर्म केले. यावेळी नोराने स्टेजवर भारताचा तिरंगा हातात धरून जय हिंदच्या घोषणा द्यायला सुरुवात केली, तेव्हा एक तिच्याकडून एक चूक झाली. उत्साहाच्या भरात नोराने तिरंगा उलटा पकडला होता. ज्यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तिरंग्याचा अवमान केल्याचे अनेकांनी म्हटले आहे. नोराने तिरंगा उलट दिशेने म्हणजे हिरव्या रंग सर्वात वर असलेल्या दिशेने पकडला होता.

कोण आहे नोरा फतेही?
बॉलिवूडमध्ये दिलबर गर्ल म्हणून नोरा फतेहीला ओळखले जाते. नोराने अनेक आयटम साँगमध्ये काम केले आहे. तिचा जन्म कॅनडा येथे झाला. हार्डी संधूच्या 'नाह' या गाण्यामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. हे गाणे हिट झाल्यानंतर नोराने अनेक टी- सीरिजच्या गाण्यांमध्ये काम केले. नोराला अनेका वेळा बेस्ट डान्सर या पुरस्काराने गौरवण्यात आले. रिपोर्टनुसार नोरा एका गाण्यात काम करण्यासाठी 40 लाख मानधन घेते. जाहिरातीसाठी ती पाच लाख घेते. नोराची एकूण संपत्ती 12 कोटी रूपये आहे. ती दरवर्षी दोन कोटी रूपये कमावते. नोराने वरुण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कड, जॉन अब्राहम आणि सलमान खान या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. झलक दिखला जा, बिग बॉस-9, कॉमेडी नाइट्स बचाओ, डान्स प्लस 4 या शोमधून नोरा प्रेक्षकांच्या भेटीस आली.

बातम्या आणखी आहेत...