आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन फन:नोरा फतेहीने रिक्रिएट केले 'बिग बॉस 5'मधील वादग्रस्त भांडण, दुहेरी भूमिका साकारुन चाहत्यांचे केले मनोरंजन 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोराने उत्कृष्ट अंदाज आणि एक्स्प्रेशन्ससह हा व्हिडीओ बनवला आहे.

लॉकडाऊन दरम्यान अभिनेत्री नोरा फतेही तिच्या फिटनेससोबतच चाहत्यांच्या करमणुकीकडे पूर्ण लक्ष देत आहे. अलीकडेच तिने एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती दुहेरी भूमिका साकारत बिग बॉसमधील भांडण दाखवत आहे.   'स्ट्रीट डान्सर 3' फेम अभिनेत्री नोराने 'बिग बॉस 5' मधील वादग्रस्त भांडण रिक्रिएट केलेला व्हिडिओ शेअर केला आहे.  'बिग बॉस 5'मध्ये पूजा मिश्रा आणि शोनाली नागरानी यांच्यात डस्टबिनवरुन भांडण झाले होते. नोराने उत्कृष्ट अंदाज आणि एक्स्प्रेशन्ससह हा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओ शेअर करुन तिने लिहिले की, "समस्या खूप वाढत आहे, सध्या प्रत्येकजण क्वारंटाईन आहे. क्वारंटाईन लाइफ. पूजा हे असं कसं वागणं आहे? टिक टॉक'.'

बिग बॉस' च्या 9 व्या सीझनमध्ये नोरा फतेहीने वाइल्ड कार्ड एन्ट्री देखील केली, त्यानंतर तिला घराघरात ओळख मिळाली. बरीच गाणी आणि चित्रपटांमध्ये स्पेशल अपिअरन्स दिल्यानंतर नोरा पहिल्यांदाच 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटात वरुणसोबत काम करताना दिसली आहे. लवकरच ती 'भुज द प्राइड ऑफ इंडिया' या मल्टीस्टारर फिल्ममध्ये दिसणार आहे.

View this post on Instagram

LOL Ramesh thinks im doing too much.. 😅😬

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on May 19, 2020 at 6:07am PDT

बातम्या आणखी आहेत...