आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री नोरा फतेही हिची करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूरसोबत लग्न करायची इच्छा आहे. अलीकडेच ‘वॉट वूमन वाँट’ या चॅट शोमध्ये नोराने आपली ही इच्छा करीनाकडे बोलून दाखवली.
करीना कपूरने आपल्या ‘वॉट वूमन वाँट’ या चॅट शोच्या नवीन भागामध्ये नोरा फतेहीसोबत गप्पा मारल्या आहेत. याच गप्पांदरम्यान नोराने तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. 'मला अपेक्षा आहे की जेव्हा तैमूर मोठा होईल तेव्हा मी त्याच्यासोबत एंगेजमेंट आणि लग्न करण्याचा विचार करु शकते,' असे नोरा म्हणाली. हे ऐकून करीना धक्काच बसला.
28 वर्षीय नोराचे हे बोलणे ऐकून करीना हसतच म्हणाली, 'तो सध्या चार वर्षांचा आहे. त्याच्या लग्नाला खूप वेळ आहे.' त्यावर नोराने 'चालेल मी वाट पाहीन,' असे उत्तर दिले. 20 डिसेंबर 2016 रोजी जन्मलेल्या तैमूरने नुकताच आपला चौथा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी करीनाने तैमूरविषयीचं प्रेम व्यक्त करताना एक भावनिक नोट लिहिली होती. करीनाने लिहिले होते, 'माझ्या मुला.. वयाच्या चौथ्या वर्षीच तुझ्याकडे असलेला दृढनिश्चय, आत्मसमर्पण आणि लक्ष केंद्रीत करण्याची वृत्ती पाहून मला फार आनंद होतो. माझ्या मेहनती मुलावर देवाचा सदैव आशीर्वाद असो. सोबतच बर्फवृष्टीचा आनंद घेण्याला, फुलांशी खेळायला, इकडे-तिकडे बागडायला आणि वाढदिवसाचा संपूर्ण केक खायला विसरू नकोस. तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुला आनंद देणाऱ्या गोष्टी करायला विसरू नकोस. तुला तुझ्या अम्माशिवाय जास्त कोणीच, कधीच प्रेम करू शकत नाही. टिम, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा”, अशा शब्दांत करीनाने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
नोरा मूळची मोरोक्को, कॅनडाची आहे. 2014 मध्ये रिलीज झालेल्या ‘रोर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर तिने 'बाहुबली: द बिगनिंग' यासह काही हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये स्पेशल अपिअरन्स दिला होता. बाहुबली या चित्रपटातील 'मनोहरी' मध्ये ती दिसली होती. मात्र, 'बिग बॉस 9' या रिअॅलिटी शोमधून तिला खरी ओळख मिळाली होती. या शोमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.