आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहीत आहे का?:कधीकाळी दिशा पाटणीला डान्स शिकवायची नोरा फतेही, दोघींचा जुना फोटो झाला व्हायरल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘बागी 2’ फेम अभिनेत्री दिशा नोराकडून डान्स शिकत होती.

दिशा पाटणी आणि नोरा फतेही यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फाेटो दिशा आणि नोराच्या करिअरमधील सुरुवातील काळातील आहे. जेव्हा दोघीही आपले नशीब आजमावण्यासाठी बॉलीवूडमध्ये आल्या होत्या. त्या काळात ‘बागी 2’ फेम अभिनेत्री दिशा नोराकडून डान्स शिकत होती.

नोरा आधीपासूनच वेगळ्या डान्स स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. हा फोटो नोराने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. तिने यावर एक कॅप्शन लिहिले आहे...,‘बेस्ट टीचर संबोधल्याने तुझे आभार मानते. तुझी टीचर होण्याची संधी मला मिळाली याला मी माझे नशीब समजते.

वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर नोरा अजय देवगण, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हासोबत दिसणार आहे. तर दिशा सलमान खानसोबत प्रभुदेवा दिग्दर्शित ‘राधे : योर मोस्ट वाँडेट भाई’ या चित्रपटात झळकली आहे. दिशाने गोव्यात जॉन अब्राहमसोबत “एक विलेन रिटर्न्स’चे शूटिंग सुरू केले.

बातम्या आणखी आहेत...