आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाठग सुकेश चंद्रशेखरने केलेल्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस या दोन्ही अभिनेत्रींचे नाव समोर आले होते. आता या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. नोराने जॅकलिनवर गंभीर आरोप केलेत. इतकेच नाही तर तिने जॅकलिनविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात 200 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. जॅकलिन आपली प्रतिमा मलिन करतेय, असा आरोप नोराने केला आहे. शिवाय तिने 15 मीडिया हाऊसविरोधातही मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणात जॅकलिन आणि काही मीडिया हाऊसेस एकमेकांसोबत मिळून काम करत असल्याचा दावा नोराने केला आहे.
नोराने जॅकलिनवर लावले गंभीर आरोप
नोराने आपल्या याचिकेत म्हटले, सुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणात तिचे नाव जबरदस्तीने घेतले गेले. सुकेशसोबत तिचा थेट संपर्क कधीच नव्हता. ती सुकेशला त्याची पत्नी लीना मारिया पॉलच्या माध्यमातूनच ओळखत होती. सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचे वृत्तही नोराने फेटाळले. या प्रकरणात तिच्या विरोधात जे काही बोलले गेले त्यामुळे तिची प्रतिमा मलिन झाल्याचे नोराने म्हटले आहे. जॅकलिनने दुर्भावनापूर्ण भावनेने खोटी विधाने केल्याचा नोराचा आरोप आहे.
एएनआयच्या ट्वीटनुसार, 'नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिसविरोधात 200 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. जॅकलिनने द्वेषाने तिच्याविरुद्ध खोटी विधाने केल्याचा आरोप नोराने केला. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे. या प्रकरणी जॅकलिनविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.'
नोरा ही मनी लाँड्रिंग प्रकरणातील सरकारी साक्षीदार
फसवणूक प्रकरणी 10 दिवसांपूर्वी ईडीने नोराची चौकशी केली होती. त्यादरम्यान नोराने तपास एजन्सीला सांगितले होते की, सुकेश नोराचा मेव्हणा बॉबी याला जवळपास 65 लाखांची गिफ्ट करणार होता. याप्रकरणी केलेल्या चौकशीनुसार नोराला अशी ऑफर मिळाली होती, मात्र अभिनेत्रीने त्याला नकार दिला. नोराला सुकेशकडून वारंवार फोन येत असल्याने तिने त्याचा नंबर ब्लॉक केल्याचेही चौकशीत समोर आले. मनी लाँड्रिंग कायदा 2002 कलम 50(2) आणि 50(3) अंतर्गत नोराचे जबाब नोंदवण्यात आले. नोरा या प्रकरणात सरकारी साक्षीदार बनली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.