आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एकीकडे अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करताना दुसरीकडे अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने मात्र अभिनय क्षेत्रात पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी सज्ज होत आहे. याचा खुलासा स्वतः नव्याने व्होग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 'मी माझ्या कुटुंबीतल्या चौथ्या पिढीतील पहिली मुलगी आहे, जी कुटुंबाच्या व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर उचलणार आहे,' असे नव्याने या मुलाखतीत सांगितले आहे. नव्याचे वडील निखिल नंदा एस्कॉर्ट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. एस्कॉर्ट ही एक इंजिनिअरिंग कंपनी आहे.
यापूर्वी, गेल्या वर्षी नव्याने आपला व्यवसाय सुरू केला तेव्हा ती चर्चेत आली होती. नव्याने तिच्या तीन मित्रांसह मिळून ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्म आरा हेल्थ लाँच केले होते. हे पोर्टल महिला सक्षमीकरणासाठी काम करते.
न्यूयॉर्कमध्ये शिकली आहे नव्या
23 वर्षीय नव्या ही श्वेता बच्चन नंदा आणि निखिल नंदा यांची मुलगी आहे. नव्याने न्यूयॉर्कमधील फोरडम युनिव्हर्सिटीमधून डिजिटल तंत्रज्ञानात पदवी घेतली आहे. याव्यतिरिक्त, नव्याने प्रॉडक्ट मार्केटिंग आणि स्ट्रेटेजिक ग्रोथमध्ये एक्सपर्ट आहे. तिने स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलकडून युएक्स आणि डिझाइन थिंकिंगचे प्रमाणपत्र मिळवले आहे.
सिनेसृष्टीत येऊ इच्छित नाही नव्या
बॉलिवूडच्या बच्चन कुटुंबातील असूनही नव्याला चित्रपटांमध्ये रस नाही.
काही दिवसांपूर्वी, नव्या चित्रपटसृष्टीत येणार असल्याची अफवा पसरली होती. तेव्हा तिने एका लोकप्रिय मासिकाला मुलाखत देताना या वृत्ताचे खंडन केले होते. नव्या म्हणाली होतीकी, चित्रपटांमध्ये येण्याचा माझा हेतू नाही. नव्या त्यावेळी मॅनहॅटनमधील एका जाहिरात एजन्सीमध्ये इंटर्नशिप करत होती. नव्याची आई श्वेतानेही स्पष्ट केले होते की, त्यांची मुलगी इंडस्ट्रीत येऊ होऊ इच्छित नाही, ती या इंडस्ट्रीच्या विरोधात नाही परंतु या इंडस्ट्रीमध्ये जगणे कठीण आहे, असे नव्याचे मत असल्याचे श्वेता बच्चन नंदा यांनी सांगितले होते.
एंझायटीबरोबर केला संघर्ष
अलीकडेच नव्या आरा हेल्थ फाउंडेशनच्या एका व्हिडिओमध्ये दिसली होती. या व्हिडिओमधे तिने एंझायटी बरोबर संघर्ष केल्याचे उघड केले होते. त्यावर मात करण्यासाठी थेरपीचा सहारा घेतला
असल्याचेही तिने सांगितले होते.
वादात अडकली आहे नव्या
नव्या एमएमएस कॉन्ट्रोव्हर्सीमध्येही अडकली आहे. 2016 मध्ये तिची एक क्लिप समोर आली होती, ज्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि नव्या सारखे हुबेहुब दिसणारे होते. नव्या आणि आर्यन
यांच्या नावाने हा बनावट व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. नव्या आणि आर्यन खूप चांगले मित्र आहेत, पण त्यांच्या अफेअरच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.