आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहित आहे का?:ऐश्वर्या आणि अनिल कपूर नव्हे तर शाहरुख खान आणि महिमा चौधरी होते ‘ताल’साठी पहिली पसंत, जाणून घ्या खास किस्से

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 13 ऑगस्ट 1999 रोजी ताल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

सुभाष घई यांच्या क्लासिक ‘ताल’ चित्रपटाला नुकतीच 21 वर्षे पूर्ण झाली. ऐश्वर्या राय, अनिल कपूर आणि अक्षय खन्ना अभिनीत या चित्रपटाविषयी काही किस्से जाणून घ्या...

 • ‘परदेस’नंतर शाहरुख-महिमासाेबत काम करू इच्छित होते सुभाष घई

घई आधी शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांना घेणार हाेते. मात्र काही कारणास्तव त्यांना घेऊ शकले नाहीत. त्यांनी मनीषा कोईरालादेखील यासाठी संपर्क केला होता मात्र तिने नकार दिला होता. त्यानंतर ऐश्वर्याला घेण्यात आले मात्र तोपर्यंत शााहरुखने चित्रपट सोडला होता. शेवटी शाहरुखच्या जागी अक्षय खन्नाला घेण्यात आले. शिवाय अनिल कपूरने जी भूमिका साकारली त्यासाठी आधी गोविंदाशी संपर्क करण्यात आला होता.

 • अनिल आणि ऐश्वर्याचा सोबतचा पहिला चित्रपट

चित्रपटात ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर यांच्यात प्रेमाचे त्रिकोण दाखवण्यात आले. अक्षय आणि ऐश्वर्या यांनी “आ अब लौट चलें’मध्ये सोबत काम केले होते. पण अनिल आणि ऐश्वर्या यांचा हा सोबतचा पहिला चित्रपट होता. याच्या पुढच्या वर्षी दोघे सतीश कौशिक यांच्या “हमारा दिल आपके पास है’ मध्ये एकत्र दिसले होते, तोही हिट ठरला हाेता. २०१८ मध्ये दोघे १८ वर्षानंतर तिसऱ्यांदा पुन्हा सोबत दिसले.

 • नैसर्गिक सौंदर्यामुळेच झाली होती ऐश्वर्याची निवड

या चित्रपटाच्यावेळी ऐश्वर्या राय चित्रपटात स्थायिक होण्यासाठी संघर्ष करत होती. त्याचवेळी सुभाष घईने तिला या चित्रपटात घेतले, याचे कारण सांगताना सुभाषने सांगितले हेाते, ऐश्वर्याचे नैसर्गिक सौंदर्य पाहून मी चकित झालो होतो. ऐश्वर्या त्यांच्या चित्रपटातील हीरोइन मानसीशी मिळती-जुळती होती. अक्षय खन्ना यांनीदेखील एका मुलाखतीत सांगितले होते, ऐश्वर्याचे सौंदर्य पाहून मीदेखील चकित झालो होतो. जेव्हा त्यांना भेटायचो त्यांनाच पाहत राहायचो.

 • चित्रपटात शाहिद असल्याचे घई यांना माहीत नव्हते

हा चित्रपट बनला त्यावेळी शाहिद कपूर नवीन होता, तो कोरिओग्राफर श्यामक डावरच्या टीममध्ये डान्स करायचा. 'ताल’च्या एका गाण्यात तो ऐश्वर्याच्या सोबतही दिसत आहे. तेव्हा घई यांना माहीत नव्हते की शाहिद अभिनेते पंकज कपूर यांचा मुलगा आहे. त्यांना फक्त चित्रपटात एक देखणा मुलगा हवा होता, जो गाण्यात ऐश्वर्या रायच्या डोक्यावर ओढणी टाकू शकेल, त्यामुळे त्यांनी शाहिदची निवड केली.

 • 'ताल'ने माझ्यातील अभिनेत्रीची जाणीव करून दिली : ऐश्वर्या

ऐश्वर्या या चित्रपटाला आपल्या आयुष्याचा सर्वात खास चित्रपट मानते. एका मुलाखतीत तिने सांगितले होते, ताल चित्रपटानंतरच लोकांनी मला एका अभिनेत्रीच्या रूपात स्वीकारले. ही प्रतिष्ठा मिळवणे मिस इंडिया आणि मिस वर्ल्डचा ताज मिळवण्यापेक्षाही अवघड होते. मला शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच माहीत होते, हा चित्रपट जादू करेल आणि तो दिवस उजाडला. आमच्या मेहनतीचे चीज झाले आणि लोकांना ताल आवडला.

यश आणि पुरस्कार

 • 1999 मध्ये 'ताल’ वर्षाच्या टॉप 5 चित्रपटांत सहभागी झाला होता. त्या वेळी चित्रपटाने 51 कोटी रुपये कमावले होते.
 • 2005 मध्ये चित्रपट शिकागो चित्रपट महोत्सवात आणि एबर्ट फेस्ट चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता.
 • 2014 मध्ये 45 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात देखील दाखवण्यात आला.
 • 10 फिल्मफेअर पुरस्कारांत नामांकन मिळाले होते. त्यापैकी 6 पुरस्कार मिळवले.
 • बॉक्स ऑफिस यादीच्या 20 टाॅप चित्रपटात सहभागी होणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता.
बातम्या आणखी आहेत...