आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आदिपुरुष':दीपिका पदुकोण नव्हे तर कृती सेनन साकारणार 'सीता', प्रभाससोबत झळकणार; भूमिकेसाठी कृती सोडू शकते नॉनव्हेज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शूटिंग दरम्यान कृतीला नॉनव्हेज सोडावे लागणार आहे.

ओम राऊत दिग्दर्शित िबग बजेट चित्रपट ‘आदिपुरुष’सुरुवातीपासूनच कलाकार आणि उत्कृष्ट विषयामुळे चर्चेत आहे. चित्रपटात एकीकडे प्रभास भगवान रामच्या भूमिकेत दिसणार आहे तर दुसरीकडे सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर कृती सेनन यात सीतेची भूमिका साकारणार आहे.

खरं तर सीतेच्या भूमिकेसाठी ओम राऊत पूर्वी दीपिका पदुकोणला घेणार होते मात्र दीपिका आधीपासूनच प्रभाससोबत नाग अश्विनचा एक विज्ञानावर आधारित काल्पनिक चित्रपटावर काम करत आहे. त्यामुळे तिने याकडे लक्ष दिले नाही.

आता कृतीसमोर चित्रपटात काम करणे मोठे आव्हानात्मक झाले आहे. कारण तिला सीतेच्या भूमिकेत दिसायचे आहे त्यामुळे शूटिंग दरम्यान तिला नॉनव्हेज सोडावे लागणार आहे. कृतीनेदेखील यावर सहमती दर्शवली आहे, तिच्या मते या काळात नॉनव्हेज सोडणे योग्य राहील. त्यामुळे भूमिका साकारण्यात मदत मिळेल आणि नेचरदेखील स्वात्विक राहील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser