आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकरीना कपूर नेहमीच चर्चेत असते. लवकरच ती आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच एका मुलाखतीत तिने प्रांजळपणे कबूल केले की या वर्षी ती 42 वर्षांची होणार आहे आणि हे कबूल करण्यास तिला कोणतीही अडचण नाही.
खरं तर अनेक अभिनेत्री आपले वय लपवतात. ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित सुद्धा आपलं वय करीनाप्रमाणे लपवत नाहीत. आपल्या समाजात महिलांचे वय लपविणे खूप सामान्य आहे, पण का?
वय लपवण्यात आनंद वाटतो
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजीव मेहता यांनी सांगितले की, आपल्या समाजात तरुण वय चांगले असे म्हटले जाते. अनेक क्रीम आणि साबणाच्या जाहिरातींमध्येही एकप्रक्रारे वय लपवण्याचा संदेश असतो. अशा परिस्थितीत तरुण वय म्हणजे चांगलं दिसणं असा समाजाचा विचार बनला आहे. त्यामुळे त्यांना बरेही वाटते.
असं असलं तरी प्रत्येकाला आपल्या वयापेक्षा लहान दिसावं असं वाटतं, अशा वेळी वयही कमी सांगितलं जातं. त्याच वेळी, अभिनेते वा अभिनेत्री त्यांना अधिक काम मिळावं यासाठी त्यांचे वय लपवतात. तरुण वय म्हणजे आयुष्य आणि म्हातारपण म्हणजे शेवट. त्यामुळे महिला या स्वत:ला तरुण म्हणवतात
काही लोकांना गेरास्कोफोबियाचाही त्रास होतो
गेरास्कोफोबिया हा एक प्रकारची भीती आहे. यामध्ये व्यक्तीला वृद्धत्वाची भीती वाटते. डॉ.राजीव मेहता यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने आपले वय स्विकार केले नाही किंवा त्याला वृद्ध होण्याची भीती वाटत असेल तर तो चिंतेचा शिकार होऊ शकतो. पुढे त्याला मानसिक आजार होण्याची शक्यता असते.
जेव्हा एखादी व्यक्ती नेहमी एकाच गोष्टीचा विचार करत असतो, तेव्हा तो इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि राग, नैराश्य, एकाकीपणाने घेरला जातो.
कतरिना कैफपासून कंगनापर्यंत या नटींनी बोलले खोटे
कतरिना कैफने मीडियाला सांगितले की, ती रणबीर कपूरपेक्षा लहान आहे. खरं तर हे दोघेही एकाच वयाचे आहेत. तसेच नेहमी वादाच्या भवऱ्यात असणारी कंगना राणौतनेही तिच्या वयाबद्दल खोटे बोलले आहे.
2009 मध्ये तिने 22 वर्षांचे असल्याचे सांगितले होते, जेव्हा तिचा पासपोर्ट मीडियासमोर आला होता, त्यानुसार ती 28 वर्षांची निघाली होती.
रोहमनने सुष्मितापासून आपलं वय लपवलं होतं
जेव्हा सुष्मिता सेन मॉडेल रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती, तेव्हा तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, रोहमनने त्याचे वय बरेच दिवस लपवले होते. जेव्हा ती त्याला त्याचे वय विचारायची तेव्हा तो तिला अंदाज लावायला सांगायचा. अनेक मुलांना त्यांचे वय सांगणे सोयीचे वाटत नाही.
याबाबत डॉ राजीव मेहता सांगतात की, मुलींप्रमाणेच मुलांनाही त्यांचे वय कमी सांगून किंवा लपवून छान वाटतं. त्यांनासुद्धा आयुष्यभर तरुण दिसावं असेच वाटते.
5 पैकी 1 जण खोटे वय लिहितो
नेदरलँड्सच्या इरास्मस युनिव्हर्सिटीने डेटिंग अॅप्सचे सर्वेक्षण केले. यामध्ये 5 पैकी 1 व्यक्तीने त्यांच्या ऑनलाइन डेटिंग प्रोफाइलवर खोटे वय लिहिले होते.
या सर्वेक्षणात, पुरुषांना तरुण मुलीला डेट करण्याच्या इराद्याने त्यांनी वय लपवले असा युक्तीवाद सांगीतला आहे.
तरूण दिसण्यासाठी सौंदर्यप्रसाधनांचा बाजार वाढला आहे
प्रत्येक स्त्रीला सुंदर आणि तरुण दिसण्याची इच्छा असते, जरी तिचे वय 50 पेक्षा जास्त असले तरी. आजकाल बाजारात अनेक अँटी-एजिंग उत्पादने विकली जात आहेत ज्यांचा दावा आहे की त्यांचा वापर केल्याने त्वचेला सुरकुत्यांपासून संरक्षण मिळते.
एसीनेल्सनच्या मार्केट रिसर्चनुसार, भारतात 3000 कोटींची स्किन केअर मार्केट आहे. यामध्ये 60 कोटींहून अधिकची बाजारपेठ केवळ अँटी-एजिंग कॉस्मेटिक्ससाठी आहे.
एलिझाबेथ बॅथरी कुमारिकांचे रक्त प्यायची
हंगेरियन राजघराण्यातील एलिझाबेथ बॅथोरी ही इतिहासातील सर्वात क्रूर राणी असल्याचे म्हटले जाते. ती 16 व्या शतकातील सिरीयल किलर म्हणून ओळख होती.
स्वत:ला तरुण ठेवण्यासाठी तिने 650 हून अधिक अविवाहित मुलींची हत्या केल्याचं समजतं. ती तरूण अविवाहित मुलीच्या रक्ताने आंघोळ करायची आणि त्याचे रक्त प्यायची.
इजिप्शियन राणी गाढविणीच्या दुधात आंघोळ करत होती
इजिप्शियन राणी क्लिओपात्रा अतिशय सुंदर मानली जाते. इतिहासकारांच्या मते, तरुण दिसण्यासाठी ती दिवसातून दोनदा गाढविणीच्या दुधाने आंघोळ करत असे. या दुधात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात. स्कॉटलंडची राणी मेरी नेहमीच तरुण दिसायची. यासाठी ती स्वतःला खूप वेळ द्यायची. वृद्धत्वापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी ती वाइनने आंघोळ करायची.
एवढेच नाही तर वय लपवण्यासाठी चीनची राणी वू जेटियन दिवसातून 3 वेळा चेहऱ्यावर मूग डाळ मास्क लावायची.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.