आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या जाहिरातीत अनुष्का:करीना कपूर खान नव्हे तर आता अनुष्का शर्मा ‘प्रेगा न्यूज’ची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, म्हणाली...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्का शर्मा म्हणाली, मी प्रेगा न्यूज सोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.

प्रेगा न्यूज या प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनवणा-या आघाडीच्या कंपनीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. अनुष्कापूर्वी करीना कपूर खान त्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होती. यावेळी कंपनीने करीना ऐवजी अनुष्काला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले आहे. बिझनेस इनसायडरच्या वृत्तात याविषयी नमूद करण्यात आले आहे.

अनुष्का या कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यानंतर ही जाहिरात टेलिव्हिजन, डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया अशा विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठी आणि हिंदीसह बंगाली गुजराती, पंजाबी, आसामी आणि उडिया या प्रादेशिक भाषांमध्ये ही जाहिरात प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे अनुष्का शर्मा लवकरच आई होणार असून जानेवारी 2021मध्ये बाळाला जन्म देणार आहे.या जाहिरातीमध्ये अनुष्का प्रेग्नेंसीमध्ये एक आई होण्याच्या स्वप्नाचा आनंद घेताना दिसणार आहे.

अनुष्का शर्मा याबद्दल बोलताना म्हणाली की, "प्रेगा न्यूज बरोबर काम करण्याचा मला आनंद आहे. प्रेगा न्यूज म्हणजेच गुड न्यूज’. हीच या ब्रँडची टॅगलाईन देखील आहे. अनेक माता प्रेगा न्यूज बरोबर जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी प्रेगा न्यूज सोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे."

प्रेग्नेंसीत शीर्षासन करतानाचा फोटो केला होता शेअर

बेबी बंपसोबत अनुष्काने शीर्षासन करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात तिला पती विराट कोहली मदत करताना दिसला. अनुष्काने फोटो शेअर करत लिहिले होते, ‘हा हात खाली पाय वर करण्याचा सगळ्यात कठीण व्यायाम आहे. योगा हा माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे. माझ्या डॉक्टरांनी देखील मला सांगितले की, मी जास्त ताण पडणारी किंवा जास्त वाकायला लागणार नाही, अशी सर्व आसने करू शकते. परंतु, योग्य त्या सगळ्या सावधानीसहच. मी अनेक वर्षांपासून शीर्षासन करतेय. भिंत मी आधार म्हणून वापरली आहे. तर, माझा खंबीर पती मला संतुलन साधण्यास आणि अधिक सुरक्षेसाठी मदत करतो आहे. माझ्या गरोदरपणातही मी योगासनं करू शकते याचा मला खूप आनंद आहे.’’

अखेरची 'झिरो' मध्ये दिसली होती अनुष्का
अनुष्काच्या कामाबद्दल सांगायचे म्हणजे, ती शेवटची 'झिरो' या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत झळकली होती. निर्माती म्हणून तिची 'पाताल लोक' ही वेब सीरिज लोकांच्या पसंतीस पडली होती. याशिवाय तिने 'बुलबुल' या सिनेमाची देखील निर्मिती केली होती. हा चित्रपट 24 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser