आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटींचे नातेवाईक अडचणीत:आता एनसीबीच्या रडारवर अर्जुन रामपालचा मेहुणा, अगिसिलाओसला चरस आणि अल्प्राझोलमसह पोलिसांनी केली अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला यांचीही चौकशी केली जाऊ शकते.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ अगिसिलाओस याला अटक केली आहे. अगिसिलाओसजवळ चरस आणि बंदी असलेल्या अल्प्राझोलमच्या टॅबलेट आढळल्या आहेत. त्याला एनसीबीने लोणावळा येथून अटक केली. या प्रकरणात आता अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला यांचीही चौकशी केली जाऊ शकते.

  • एनसीबीने शोधून काढली ड्रग्ज पेडलर्सची साखळी

एनसीबीच्या म्हणण्यानुसार तो ड्रग्ज सप्लाय करत होता. क्विंटच्या वृत्तानुसार, ज्यांना ड्रग्ज प्रकरणात आरोपी बनवले गेले आहे, त्या सर्वांच्या संपर्कात 30 वर्षीय अगिसिलाओस होता. एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, अगिसिलाओस डेमेट्रियड्स भारतात बराच वेळ घालवत होता आणि मार्केटिंगमध्येही त्याचा सहभाग होता.

  • दीपिकाच्या व्हायरल चॅटमधील 'A' म्हणजे अर्जुन

एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 ए अंतर्गत 18 ऑक्टोबरला अगिसिलाओस कोर्टात हजर करण्यात आले होते. एनसीबीला अगिसिलाओसची दोन दिवसांची कस्टडी मिळाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दीपिका पदुकोणच्या व्हायरल चॅटमध्ये अगिसिलाओसचा भावोेजी म्हणजे अर्जुन रामपालचे नाव समोर आले आहे.

एनसीबीने अद्याप याची पुष्टी केली नव्हती. मात्र आता ग्रॅबिएलाच्या भावाचे कनेक्शन समोर आल्यानंतर अर्जुनदेखील या ड्रग्ज व्यवसायात सामील असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

बातम्या आणखी आहेत...