आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन:आई आणि आजीबरोबर भाज्या स्वच्छ करताना दिसली नुसरत भरुचा, व्हिडिओ शेअर करत म्हणाली - 'कहानी घर घर की' 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुसरत भरुचा लवकरच आगामी ‘छलांग’ चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत दिसणार आहे.

'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपट झळकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या कुटुंबासमवेत क्वालिटी वेळ घालवत आहे. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या आई आणि आजीसोबत भाज्या स्वच्छ करताना दिसली. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये 'कहानी घर-घर की' असे लिहिले. 

व्हिडिओमध्ये नुसरत आणि तिची आई जमीनीवर बसून समोर ठेवलेल्या विविध प्रकारच्या भाज्या स्वच्छ करत आहेत, तर आजी सोफ्यावर बसून त्यांना मदत करतेय. व्हिडिओमध्ये नुसरतची आई तिच्याशी इंग्रजी मिक्स गुजराती भाषेत बोलतेय. व्हिडिओच्या शेवटी नुसरतने 'कहानी घर-घर की' या मालिकेचे संगीतही जोडले आणि सौजन्य म्हणून बालाजी टेलिफिल्म्स आणि स्टार प्लसचे नाव लिहिले.

यापूर्वी नुसरतने आपल्या वर्कआऊटचा एक जुना व्हिडिओ शेअर करुन त्याची आठवण येत असल्याचे म्हटले होते.  

View this post on Instagram

Miss working out with you @prashantsixpack!

A post shared by nushrat (@nushratbharucha) on Apr 12, 2020 at 12:31am PDT

बातम्या आणखी आहेत...