आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोव्हेंबरपासून 'छोरी 2'चे चित्रीकरण सुरु करणार नुसरत भरुचा:एक मोठा हॉलिवूड स्टुडिओ सिक्वेलचा लूक करणार डिझाइन

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी चित्रपटाचा होता हिंदी रिमेक

नुसरत भरुचाच्या 'छोरी' चित्रपटाच्या सिक्वेलच्या शूटिंगबाबत एक अपडेट समोर आले आहे. वृत्तानुसार, नुसरत या वर्षी नोव्हेंबरमध्ये चित्रपटाच्या पार्ट 2 चे शूटिंग सुरू करणार आहे. तसेच या चित्रपटात काही नवे चेहरेही दिसणार असल्याचे वृत्त आहे.

नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे 'छोरी 2'चे शूटिंग
पिंकविलाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, "छोरी 2 ची कथा चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या शेवटापासून सुरू होईल आणि तेथून ते एक नवीन वळण घेईल. नुसरत आणि चित्रपटातील इतर काही कलाकार सिक्वेलमध्ये त्यांच्या मूळ पात्रांमध्ये दिसणार आहेत. सोबतच काही नवीन लोकप्रिय चेहरे देखील 'छोरी 2' च्या टीममध्ये सामील होणार आहेत. विशाल सध्या चित्रपटाची पटकथा लिहित आहेत. ते छोरीसाठी काही नवीन आणि रंजक क्रिएट करत आहेत. लवकरच चित्रपटाच्या कास्टिंगची प्रोसेसही सुरु होणार आहे."

हा चित्रपट मोठ्या स्केलवर बनवला जाणार आहे
सूत्राने पुढे सांगितले, 'छोरी 2 त्याच्या पहिल्या भागापेक्षा खूप मोठ्या स्केलवर तयार केला जाईल. निर्माते अबुदंतिया एंटरटेनमेंट, टी-सीरीज आणि हॉलिवूड क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिप्ट टीव्ही या चित्रपटासह भारतातील पहिली हॉरर फ्रेंचाइजी तयार करण्यास उत्सुक आहेत. क्रिप्ट टीव्ही प्रोस्थेटिक्स आणि इतर इफेक्ट्सच्या मदतीने 'छोरी 2'चा लूक देखील डिझाइन करेल. चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील अनेक शहरांमध्ये केले जाईल."

डिसेंबरमध्ये या चित्रपटाच्या सिक्वेलची करण्यात आली होती घोषणा

'छोरी' हा चित्रपट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज झाला होता आणि त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर डिसेंबर 2021 मध्येच या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली होती. घोषणा करताना, नुसरतने सोशल मीडियावर लिहिले होते, "तुमचे प्रेम आणि प्रोत्साहनामुळेच आम्ही परत येत आहोत. मला तुम्हाला कळवताना आनंद होतोय की, छोरीमध्ये लवकरच आणखी एक नवीन एडिसन छोरी 2 जोडली जाणार आहे."

मराठी चित्रपटाचा होता हिंदी रिमेक
'छोरी' हा मराठी चित्रपट 'लपाछपी'चा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात नुसरत भरुचाशिवाय मीता वशिष्ठ आणि सौरभ गोयल यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट 26 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...