आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिस:नुसरत भरुचाचा 'जनहित में जारी'चे कलेक्शन पहिल्याच दिवशी मंदावले, केला फक्त 43 लाखांचा व्यवसाय

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'जुरासिक वर्ल्ड डोमिनियन'ने केली 8 कोटींची कमाई

अभिनेत्री नुसरत भरुचा स्टारर 'जनहित में जारी' हा चित्रपट शुक्रवारी (10 जून) बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. त्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसून येत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 43 लाख रुपयांचीही कमाई केली आहे. 20 कोटींच्या कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट मोठा तोटा देणारा ठरेल, असे व्यापार विश्लेषकांचे मत आहे.

'जनहित में जारी'चे अनेक शो रद्द करण्यात आले
एवढेच नाही तर पहिल्या वीकेंडमध्ये हा चित्रपट केवळ 1 ते दीड कोटींचा व्यवसाय करू शकेल, असा विश्लेषकांचा अंजाज आहे. या चित्रपटाचा लाइफटाईम बिझनेसही केवळ 2-4 कोटींचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, 'जनहित में जारी' हा चित्रपट पहिल्या दिवशी केवळ 43 लाख रुपयांचा व्यवसाय करू शकला आहे. हा चित्रपट भारतात 1200 स्क्रीन्सवर हिंदीत रिलीज झाला आहे. मात्र, चित्रपटाला चांगला प्रतिसाद न मिळाल्याने त्याचे अनेक शो रद्द करण्यात आले आहेत.

'जुरासिक वर्ल्ड डोमिनियन'ने केली 8 कोटींची कमाई
या चित्रपटासह प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट 'जुरासिक वर्ल्ड डोमिनियन' आणि कन्नड चित्रपट '777 चार्ली' यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पॅन इंडियावर प्रदर्शित झालेल्या रक्षित शेट्टीच्या '777 चार्ली'ने पहिल्याच दिवशी 6 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. दुसरीकडे, ख्रिस प्रॅटच्या 'ज्युरासिक वर्ल्ड डोमिनियन'ने पहिल्या दिवशी भारतातून 8 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 1994 पासून सुरू असलेली 'ज्युरासिक पार्क' फ्रँचायझी अजूनही चाहत्यांना आवडते.

तर 'जनहित में जारी'च्या रूपाने बॉलिवूडला आणखी एक मोठा झटका बसला आहे. पहिल्या दिवशीच चित्रपटाची कमाई मंदावली. चित्रपटाच्या कमाईचा आकडा पाहता व्यापार विश्लेषकांच्या मते, 'जनहित में जारी' या चित्रपटाची अवस्था अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'धाकड', 'अनेक', 'रनवे 34', 'हीरोपंती 2' आणि 'जयेशभाई जोरदार'सारख्या फ्लॉप चित्रपटांसारखी होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...