आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'छोरी'च्या निमित्ताने...:नुसरत भरुचाची 'छोरी' चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी खास तयारी, शूटिंगच्या 25 दिवस आधीपासूनच प्रेग्नेंट बॉडी सूट घालण्यास केली होती सुरुवात

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'छोरी' हा चित्रपट 26 नोव्हेंबर 2021 रोजी जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

नुसरत भरुचा 'छोरी' चित्रपटातून प्रेक्षकांना एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून यात ती गर्भवती महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. या व्यक्तिरेखेच्या सरावासाठी शूटिंगच्या खूप आधीपासून नुसरतने प्रेग्नेंट बॉडी सूट घालायला सुरुवात केली होती.

'छोरी' या हॉरर चित्रपटात गर्भवती स्त्रीच्या भूमिकेत दिसणार्‍या नुसरतने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी 25 दिवस आधी प्रेग्नेंट बॉडी सूट घालण्याचा निर्णय घेतला होता. नुसरतने गर्भवती महिलेच्या पात्रात उतरण्याचा आणि सेटवर आपले सर्वोत्तम देण्यासाठी हा निर्णय घेतला.

याविषयी नुसरत म्हणाली, "मी खऱ्या आयुष्यात इतक्या लवकर गरोदर होणार नाही म्हणून मी एक बॉडीसूट बनवला, जेणेकरून प्रेग्नेंट स्त्रिया कोणत्या परिस्थितीतून जातात हे मला कळेल. मी 20-25 दिवस आधीपासून तो परिधान करायला सुरुवात केली होती. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आणि खाणे, झोपणे, बाथरूममध्ये जाणे, फिरणे आणि त्यात येणारी बंधने समजून घेणे ही सर्व मी प्रामाणिकपणे केले. गरोदरपणाशी संबंधित सर्व गोष्टी स्वतः समजून घेण्यासाठी आणि नंतर त्यांना अधिक वास्तववादी पैलूंसह अभिनयात उतरवण्यासाठी, ज्याच्याशी प्रेक्षकांना जोडता येईल, यासाठी मला स्वतःला पूर्णपणे यात गुंतवून घ्यावे लागले. हा माझ्यासाठी प्रॉप नसला तरी माझा एक भाग होता, पण मला याची इतकी सवय झाली होती की जेव्हा शूट सुरू होते, तेव्हा मला रिहर्सल दरम्यान आराम करताना बॉडी सूटमध्ये अधिक आरामदायक वाटत होते."

गर्भधारणेच्या आधुनिक पैलूबद्दल आपले विचार शेअर करताना नुसरत म्हणाली, "आम्ही एक अतिशय वास्तववादी सिनेमा करत असल्याने, सर्व काही प्रेक्षकांना स्पून फीड करण्याची गरज नाही. हे खूप सखोल असणे आवश्यक आहे. प्रेक्षकांना टिपिकल पद्धतीने न सांगता की तुम्ही खरोखर गर्भवती आहात, त्यांना यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार करणे महत्त्वाचे होते. झोपताना किंवा बाथरूमला जाताना किंवा मिड-स्क्वाट्स करताना बॉडी सूटशी जुळवून घेणं थोडं कठीण असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्त्रीची गर्भधारणा वेगळी असते आणि कधी कधी बॉडी सूट आपल्यासोबत सतत कॅरी करणे कठीण असतं."

नुसरतला साक्षीच्या भूमिकेत पाहण्यासाठी आणि शहरातून एका निर्जन खेडेपर्यंतचा तिचा प्रवास अनुभवण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. विशाल फुरिया दिग्दर्शित आणि टी-सीरीज़, क्रिप्ट टीव्ही आणि अबुदंतिया एंटरटेन्मेंटद्वारे निर्मित 'छोरी' हा चित्रपट 26 नोव्हेंबर 2021 रोजी जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...