आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसरत जहाँनी दिली मोठी हिंट:अभिनेता यश दासगुप्तासोबत नुसरत जहाँने थाटले लग्न!, वाढदिवसाच्या केकवर लिहिले - हॅपी बर्थडे हसबंड

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी 26 ऑगस्ट रोजी नुसरत आणि यश मुलगा इशानचे आई -वडील झाले आहेत.

बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ यांनी यश दासगुप्तासोबत लग्न केल्याची चर्चा आहे. अलीकडेच, यशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नुसरत यांनी सेलिब्रेशनची काही छायाचित्रे शेअर केली, ज्यात त्यांनी केकवर यशसाठी नवरा आणि वडील असे शब्द लिहिले.

यशचा वाढदिवस साजरा करताना काही छायाचित्रेही नुसरत यांनी शेअर केली आहेत. त्यासोबतच नुसरत यांनी इन्स्टाग्रामवर यशसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी हॅप्पी बर्थडे माय लव्ह असे लिहिले आहे.

यावर्षी 26 ऑगस्ट रोजी नुसरत आणि यश मुलगा इशानचे आई -वडील झाले आहेत. खरं तर नुसरत यांनी त्यांच्या बाळाच्या वडिलांचे नाव उघड केले नाही, परंतु त्यांच्या मुलाचे बर्थ सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये वडिलांच्या नाव यश दासगुप्ता असे लिहिले होते.

नुसरत यांची सोशल मीडिया पोस्ट.
नुसरत यांची सोशल मीडिया पोस्ट.

अलीकडेच, एका मुलाखतीत नुसरत यांनी यशसोबतच्या त्यांच्या बाँडिंगबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. त्या म्हणाल्या, ‘लोकांना माहित आहे की आम्ही विवाहित आहोत की नाही? फक्त आम्ही आपल्या स्वतःच्या गोष्टींबद्दल बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की लोक जे बोलतात ते सर्व खरे आहे. माझे आणि यशचे लग्न झाले आहे की नाही याची माहिती आम्ही हातात पोस्टर घेऊन घोषणा करणार नाही. काही गोष्टी अस्पष्ट राहू द्या. आम्ही आता आनंदी आहोत. आम्ही आमच्या आयुष्यातील एक कठीण टप्पा पार केला आहे. एकमेकांसोबत बराच काळ न घालवता, न ओळखता मूल होऊ देणे हे एक धाडसी कृत्य आहे आणि मला आनंद झाला की आम्ही तसे केले.'

पहिल्या पतीबरोबर झाला वाद
काही दिवसांपूर्वी नुसरत या पती निखिल जैन यांच्याशी झालेल्या वादामुळे प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. निखिल आणि नुसरत गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून वेगळे राहत आहेत. दोघांच्या नातेसंबंधावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते, त्यानंतर नुसरत यांनी माध्यमांसमोर येऊन निखिलसोबतचे त्यांचे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. आणि सोबतच निखिल जैनवर त्यांनी पैशांचा गैरव्यवहार आणि फसवणुकीचा आरोप केला होता.

दोन वर्षांपूर्वी झाले होते लग्न
2019 मध्ये नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांनी टर्कीमध्ये लग्न केले होते. या दोघांचा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला होता. त्यानंतर सोशल मीडियावरही या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण नंतर त्यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले. स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी होणे गरजेचे होते, पण ते कधीच झाले नाही. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

बातम्या आणखी आहेत...