आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसरत जहाँचे फोटोशूट:नुसरत जहाँने यश दासगुप्तासोबत केले रोमँटिक फोटोशूट, सोशल मीडियावर दिले होते अभिनेत्यासोबत लग्नाचे संकेत!

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या फोटोशूटमध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे.

बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ बंगाली अभिनेता यश दासगुप्तासोबतच्या नात्याबद्दल आता हळूहळू उघडपणे व्यक्त होत आहेत. अलीकडेच त्यांनी यशसोबत एक फोटोशूट केले आहे, ज्यात दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. फोटोशूटमध्ये दोघे एथनिक आउटफिटमध्ये दिसत आहेत. या फोटोशूट व्यतिरिक्त नुसरत यांनी सप्तमीच्या निमित्ताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्या लाइट ब्लू कलरच्या साडीत दिसत आहे.

यशसोबत लग्न केले?
नुसरत यांनी अलीकडेच आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे यशसोबत लग्न केल्याची हिंट दिली होती. त्यांनी यशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेशनची काही छायाचित्रे शेअर केली होती, ज्यात त्यांनी केकवर यशसाठी नवरा आणि वडील असे शब्द लिहिले होते. त्यासोबतच नुसरत यांनी इन्स्टाग्रामवर यशसोबतचा एक फोटो पोस्ट करत हॅप्पी बर्थडे माय लव्ह असे लिहिले होते. यावर्षी 26 ऑगस्ट रोजी नुसरत आणि यश मुलगा इशानचे आई -वडील झाले आहेत. खरं तर नुसरत यांनी त्यांच्या बाळाच्या वडिलांचे नाव उघड केले नव्हते, परंतु त्यांच्या मुलाचे बर्थ सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये वडिलांचे नाव यश दासगुप्ता असे लिहिले होते.

याशिवाय मुलाखतीत नुसरत यांनी यशसोबतच्या त्यांच्या बाँडिंगबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या, ‘लोकांना माहित आहे की आम्ही विवाहित आहोत की नाही? फक्त आम्ही आपल्या स्वतःच्या गोष्टींबद्दल बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की लोक जे बोलतात ते सर्व खरे आहे. माझे आणि यशचे लग्न झाले आहे की नाही याची माहिती आम्ही हातात पोस्टर घेऊन घोषणा करणार नाही. काही गोष्टी अस्पष्ट राहू द्या. आम्ही आता आनंदी आहोत. आम्ही आमच्या आयुष्यातील एक कठीण टप्पा पार केला आहे. एकमेकांसोबत बराच काळ न घालवता, न ओळखता मूल होऊ देणे हे एक धाडसी कृत्य आहे आणि मला आनंद झाला की आम्ही तसे केले.'

पहिल्या पतीबरोबर झाला वाद
काही दिवसांपूर्वी नुसरत या पती निखिल जैन यांच्याशी झालेल्या वादामुळे प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. निखिल आणि नुसरत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वेगळे झाले होते. दोघांच्या नातेसंबंधावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते, त्यानंतर नुसरत यांनी माध्यमांसमोर येऊन निखिलसोबतचे त्यांचे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. आणि सोबतच निखिल जैनवर त्यांनी पैशांचा गैरव्यवहार आणि फसवणुकीचा आरोप केला होता.

दोन वर्षांपूर्वी झाले होते लग्न
2019 मध्ये नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांनी टर्कीमध्ये लग्न केले होते. या दोघांचा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला होता. त्यानंतर सोशल मीडियावरही या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण नंतर त्यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले. स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी होणे गरजेचे होते, पण ते कधीच झाले नाही. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

बातम्या आणखी आहेत...