आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Nusrat Jahan Deletes Wedding Photos From Social Media After Separating From Husband Nikhil Jain, Said – I Am Not The Woman Who Keeps Her Mouth Shut

संसार मोडला:नुसरत जहाँने पतीपासून विभक्त झाल्यानंतर सोशल मीडियावरुन लग्नाचे फोटो डिलीट केले, म्हणाली - 'मी आता त्या महिलेला आठवू इच्छित नाही  जी नेहमीच आपले तोंड बंद ठेवत असे'

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे केवळ एक लिव्ह इन रिलेशनशिप होते.

बंगाली अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहां तिचे पती निखल जैनपासून वेगळी झाल्याने चर्चेत आहे. नुसरतने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. यापूर्वी बुधवारी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये तिने म्हटले होते की, तिने 2019 मध्ये बिझनेसमन निखिल जैनसोबत टर्की कायद्यानुसार लग्न केले आणि या लग्नाला भारतात कायदेशीर मान्यता नाही. सोबतच तिने निखिलपासून विभक्त झाल्यानंतर त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

लग्नाचे फोटो डिलीट केल्यानंतर नुसरतने सोशल मीडियावर अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'मी आता त्या महिलेला आठवू इच्छित नाही. जी नेहमीच आपले तोंड बंद ठेवत असे. मी अशीच आनंदी आहे.'

नुसरत आणि निखिल गेल्या सहा महिन्यांपासून वेगळे राहात आहेत. नुसरत आणि निखिल यांचे लग्न 2019 मध्ये पार पडलेल्या सर्वच विवाहसोहळ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले लग्न होते. दोघांनी टर्कीमध्ये लग्न केले होतं आणि हनीमूनसाठी ते ग्रीसला गेले होते. या दोघांच्या लग्नापासून ते हनीमूनपर्यंत सर्वच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. पण आता नुसरतने निखिल जैनसोबत टर्कीमध्ये झालेल्या लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले आहेत.

कायदेशीररित्या आमचे लग्न मान्य नाही - नुसरत
नुसरतने आपल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले, 'निखिल आणि माझे लग्न इंटर रिलिजन होते. त्यामुळे आम्ही दोघांनी भारतातील 'स्पेशल मॅरेज अॅक्ट'नुसार लग्न करणे अपेक्षित होते. इथल्या कायद्यानुसार हे लग्न झालेले नव्हते त्यामुळे याला लग्न म्हणता येणार नाही. हे केवळ एक लिव्ह इन रिलेशनशिप होते. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नाही.'

निखिलने पैसे काढून घेतले
निखिलने तिचे सर्व खानदानी दागिने आणि पैसे सेफमधून काढून घेतल्याचा आरोप नुसरतने केला आहे. निखिल जैन आणि नुसरत जहां यांचे हे लव्ह मॅरेज होते. दोघे एकमेकांना 2017 मध्ये भेटले होते. 2019 मध्ये खासदार झाल्यानंतर नुसरतने निखिलसोबत टर्की येथे लग्न केले होते.

बातम्या आणखी आहेत...