आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई होणार आहे नुसरत जहाँ:प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या नुसरत जहाँ, पती म्हणाला होता - 'हे मूल माझे नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ चर्चेत आहेत. त्या लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. त्यांना 25 ऑगस्ट रोजी प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुसरत यांना 25 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते, पण डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. त्यांची डिलिव्हरी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कधीही होऊ शकते.

बेबी बंपसह फोटो समोर आले होते
काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांची काही छायाचित्रे समोर आली होती. या फोटोत त्यांचे बेबी बंप दिसले होते. पती निखिल जैन यांनी हे मुल त्यांचे नसल्याचे विधान केले होते.

दोन वर्षांपूर्वी झाले होते लग्न
2019 मध्ये नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांनी टर्कीमध्ये लग्न केले होते. या दोघांचा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला होता. त्यानंतर सोशल मीडियावरही या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण नंतर त्यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले.

नुसरत यांनी एक निवेदन जारी करत स्पष्ट केले होते की, त्यांचे लग्न टर्की मॅरेज रजिस्ट्रेशन कायद्यानुसार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. दोन वेगवेगळ्या धर्मातील लोकांचे हे लग्न होते. त्यामुळे त्याची स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी होणे गरजेचे होते, पण ते कधीच झाले नाही. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

नुसरत जहाँ आणि निखिल जैन
नुसरत जहाँ आणि निखिल जैन

अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा

नुसरत जहाँ आता अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. यावर यशने मात्र आम्ही दोघे फक्त प्रोफेशनल पार्टनर असल्याचे म्हटले होते. नुसरत आणि यश यांनी बंगाली चित्रपट एसओएस कोलकातामध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...