आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनोटला बलात्काराची धमकी:कंगना रनोटला धमकी देत वकील मेहंदी रझाने म्हटले - हिच्यावर बलात्कार झाला पाहिजे; वाद वाढल्यावर म्हणाला - आयडी हॅक झाला होता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणकोण नवरात्रीचा उपवास करत आहे, असे कंगनाने शनिवारी सोशल मीडियावर विचारले होते.
  • या पोस्टमध्ये कंगनाने महाराष्ट्रात तिच्याविरोधात दाखल झालेल्या FIR वरही प्रतिक्रिया दिली होती.

अभिनेत्री कंगना रनोटला सोशल मीडियावर बलात्काराची धमकी मिळाली आहे. ओडिशाच्या मेहंदी रझा नावाच्या एका वकिलाने 33 वर्षीय कंगनाच्या नवरात्री पोस्टवर कमेंट करताना 'मध्य शहरात तुझ्यावर बलात्कार व्हायला हवा," असे म्हटले आहे. मात्र जेव्हा सोशल मीडिया यूजर्सनी वकिलाला खडे बोल सुनावले तेव्हा त्याने फेसबुकवर स्पष्टीकरण दिले. मेहंदी रझाच्या म्हणण्यानुसार त्याचा फेसबुक आयडी हॅक झाला होता.

रझाने माफी मागताना आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "आज माझा फेसबुक आयडी हॅक झाला होता, माझ्या अकाउंटवरुन काही अपमानास्पद कमेंट पोस्ट करण्यात आल्या आहेत. कोणत्याही स्त्री किंवा समुदायाबद्दलचे हे माझे मत नाही. मला धक्का बसला असून मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. माझी लोकांना विनंती आहे की त्यांनी माझी माफी मंजुर करावी. माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांनी मला माफ करावे. मला घडलेल्या प्रकाराबद्दल खरोखर खेद वाटत आहे."

  • रझाने कंगनाच्या या पोस्टवर बलात्काराची धमकी दिली

शनिवारी मुंबईच्या वांद्रे न्यायालयाने कंगना रनोटवर धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करत कंगनाने एक पोस्ट लिहिली होती.

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "नवरात्रीचा उपवास कोणकोण करत आहे? हा फोटो आजच्या सेलिब्रेशनचा आहे.. कारण मी देखील उपवास केला आहे. दरम्यान, माझ्या विरोधात आणखी एक एफआयआर दाखल झाली आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेना माझ्यामागे लागली आहे. माझी जास्त आठवण काढू नका, मी लवकरच तेथे येईन," अशा आशयाचे ट्विट तिने केले होते.

याच पोस्टवर मेहंदी रझाने कंगनाला बलात्काराची धमकी दिली. वृत्तानुसार, रझा ओडिशाच्या झारसुगडा जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून काम करतो. रझाविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही समोर आले आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...