आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांतला आणखी एक सन्मान:दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स 2021 होणार सुशांत सिंह राजपूतचा सन्मान

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड 2021 मध्ये सुशांतला सन्मानित केले जाणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला जे प्रेम, फॅन फॉलोइंग आणि सन्मान मिळायला हवा होता, तो दुर्दैवाने त्या मरणोत्तर मिळत आहे. आता दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड 2021 मध्ये सुशांतला मरणोत्तर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, हा सोहळा नेमका कोणत्या दिवशी रंगणार याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

  • बहिणीने स्वीकारला होता सन्मान

महिनाभरापूर्वी कॅलिफोर्निया राज्य विधानसभेने सुशांत सिंह राजपूतचा खास सन्मान केला होता. सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने हा पुरस्कार त्याच्या वतीने स्वीकारला होता. श्वेताने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती. 15 ऑगस्ट रोजी सामाजिक कामांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सुशांतचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. श्वेताने ट्विटरच्या माध्यमातून सुशांतच्या चाहत्यांना ही माहिती दिली होती. तिने ट्विट केले होते, 'आज स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी कॅलिफोर्नियाने माझा भाऊ सुशांत सिंह राजपूतचा सन्मान केला आहे. कॅलिफॉर्निया आमच्याबरोबर आहे, तुम्ही आमच्या बरोबर आहात का? कॅलिफोर्निया तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. #GlobalPrayersForSSR #Warriors4SSR #CBIForSSR #Godiswithus', अशा आशयाचे ट्विट श्वेताने केले होते.

  • यापूर्वीही झाली होती याविषयावर चर्चा

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला राष्ट्रीय पुरस्कार दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालय यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अभिनेत्याचा विशेष प्रकारे सन्मान करू शकेल. तथापि, कोणत्या प्रकारचा सन्मान होईल हे मंत्रालयाकडून अद्याप ठरलेले नाही. मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, मरणोत्तर पुरस्कार ही श्रेणी तयार केली जाऊ शकते.

  • सुशांतच्या चित्रपटांचा महोत्सव देखील असू शकतो

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टमध्ये भारत सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की, "सुशांतच्या मृत्यूने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरुन गेली आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याला जो सन्मान मिळतोय तो हयात असताना त्याला कधीच मिळू शकला नाही. हे असमतोल आहे आणि हे सुधारणे आवश्यक आहे. सुशांतच्या चित्रपटांसाठी सरकारकडून वेगळ्या महोत्सवाचे नियोजन केले जात आहे. त्याच बरोबर राष्ट्रीय पुरस्कारांच्या वेळी त्याला सिनेमातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देण्यात येईल."

  • जिवंत असताना सुशांतला फिल्मफेअरदेखील मिळाला नाही

अभिनेता म्हणून सुशांतने 11 वर्षे एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत काम केले. यापैकी त्याने पहिली पाच वर्षे छोट्या पडद्याला दिली आणि 6 वर्षे चित्रपटांसाठी काम केले. पण या 6 वर्षात 11 चित्रपट करूनही त्याला राष्ट्रीय पुरस्कार तर दूरच पण फिल्मफेअरसुद्धा मिळाला नाही.

त्याला दोन स्क्रीन पुरस्कार मिळाले. तसेच 2017 मध्ये त्याला मेलबर्न येथे झालेल्या भारतीय चित्रपट महोत्सवा दरम्यान एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. 'एम.एस. धोनी' आणि 'का पो छे' साठी त्याला फिल्मफेअर आणि आयफासाठी नामांकन देण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...