आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे:अर्जुन कपूरच्या 35 व्या वाढदिवशी बहीण अंशुला झाली इमोशनल, म्हणाली- 'तू वडिलांप्रमाणेच माझी काळजी घेतली'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस आहे.

अभिनेता अर्जुन कपूर आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्याची धाकटी बहीण अंशुला हिने सोशल मीडियावर भावनिक नोट शेअर केली आहे. अंशुलाने लिहिले, 'हॅपी बर्थडे अर्जुन. तू माझ्या श्वास घेण्याचे कारण आहेस, माझी सर्वात आवडती व्यक्ती आणि माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती तू आहेस. ती व्यक्ती जिच्या प्रेमात कोणतेही बंधन नाही, ती व्यक्ती ज्याने मला अनुभव करु दिला की, मी जगातील सर्वात आनंदी बहीण आहे. भाऊ, तू माझ्या शक्तीचे कारण आहेस. तू माझा गार्डियन, माझा संरक्षक, माझे आईवडील, माझा मित्र, माझा भाऊ, माझा विश्वास आणि माझी लाइफ लाइन आहेस', अशा शब्दांत अंशुलाने अर्जुुनवरचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. 

भावाचे केले कौतुक : अंशुलाने पुढे लिहिले की, 'आपण लहान असतानासुध्दा तू माझी काळजी वडिलांसारखी देखभाल केली. जेव्हा माझ्याकडे काहीही नव्हते तेव्हा तू मला शक्ती दिली. मी पडण्यापूर्वी तू मला सांभाळले, कसे लढायचे, पुन्हा कसे सावरायचे हे तू मला शिकवलेस. आपल्या सगळ्या अडचणींमध्ये तू माझा हात धरला', असे अंशुला म्हणाली.

भावाचे मानले आभार : अंशुला पुढे लिहिते, 'तू मला आपल्या आईला कधीही विसरू दिले नाहीस, परंतु तिची उणीव भासणार नाही, यासाठी तू प्रत्येक वेळी प्रयत्न केला. तू मला सर्वकाही दिले आहे - मला गरजेपेक्षा अधिक दिले. मला काय हवंय हे तुला आधीच माहित असतं. अजून एक गोष्ट, तू माझे घर आहे. आणि माझ्यावरील तुझ्या प्रेमामुळे मला विश्वास वाटतो की मी प्रेमासाठी पात्र आहे', असे अंशुला म्हणाली. 

बातम्या आणखी आहेत...