आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लैंगिक अत्याचार प्रकरण:पायल घोषच्या आरोपांनंतर अनुराग कश्यपने वकिलांच्या मार्फत दिली प्रतिक्रिया, म्हणाले - मीटू मोहिम स्वतःच्या स्वार्थासाठी आणि दुस-याच्या चारित्र्यहननासाठी अशाप्रकारे वापरली जातेय

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुरागच्या वकिलांनी म्हटल्यानुसार, त्याच्यावरचे लैंगिक गैरवर्तनाचे सर्व आरोप खोटे आहेत.

अभिनेत्री पायल घोषने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली असे ट्विट पायलने केले. इतकेच नाही तर पायलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली असून 'नरेंद्र मोदीजी आपण याप्रकरणी कारवाई करावी आणि या क्रिएटिव्ह माणसाआडचा राक्षस देशाला पाहू द्या,' अशी विनंती पायलने त्यांना केली. तर अनुरागने स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आता त्याने त्याच्या वकिलामार्फत एक निवेदन जारी केले आहे. अनुरागच्या वकिलांनी म्हटल्यानुसार, अनुरागवरचे लैंगिक गैरवर्तनाचे सर्व आरोप खोटे आहेत.

अनुरागने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्या वतीने माझ्या वकील प्रियांका खिमानी यांची प्रतिक्रिया, असे अनुरागने लिहिले आहे.

अनुरागच्या वकील प्रियांका खिमानी म्हणाल्या, ''माझे अशील अनुराग कश्यप यांच्यावर अलीकडे लावण्यात आलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या खोट्या आरोपांमुळे दुःख झाले आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे व निंदनीय आहेत. मीटू मोहिम स्वतःच्या स्वार्थासाठी आणि दुस-याच्या चारित्र्यहननासाठी अशाप्रकारे वापरली जातेय, हे दुर्दैवी आहे. असे खोटे आरोप मीटू मोहिमेला कमकुवत बनवतात आणि ख-या पीडितांना वेदताना देतात.''

पायल घोषने लावले अनुरागवर गंभीर आरोप, म्हणाली - अनुराग माझ्यासमोर न्यूड झाला होता अनुरागने माझा लैंगिक छळ केला, तसंच अभद्र भाषेचाही वापर केला, असा आरोप पायल घोषने केला आहे. एका मुलाखतीत पायलने तिची आपबिती कथन केली.

तिने सांगितल्यानुसार, "मी अनुराग यांना भेटायला त्यांच्या यारी रोड इथल्या ऑफिसमध्ये गेली होती. ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत होते म्हणून मी परत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि बोलावले. काही ग्लॅमरस घालू नको असे त्यांनी सांगितले. म्हणून मी सलवार कमीज घालून त्यांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी जेवण बनवले, आमचे जेवण झाल्यानंतर त्यांनी माझी जेवणाची प्लेटही उचलली. त्यानंतर मी तिथून निघून आले. त्यांनी मला पुन्हा मेसेज करून बोलावले. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता म्हणून मी त्यांना भेटायला नाही येऊ शकत असे सांगितले." यानंतर दोन-तीन दिवसांनी मी अनुराग यांना पुन्हा भेटले, यावेळी मी त्यांच्या घरी गेले होते, असे पायलने सांगितले.

पायल म्हणाली, "त्यांनी मला घरी बोलावले होते. ते स्मोकिंग करत होते, मी तिथे बसले होते. त्यानंतर अनुराग यांनी मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक ते माझ्यासमोर न्यूड झाले आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्यांना म्हटले मला कन्फर्टेबल वाटत नाहीये, यावर ते मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाले. मी पुन्हा त्यांना सांगितले, मला अस्वस्थ वाटतंय. काही तरी करून मी तिथून कसाबसा पळ काढला. त्यानंतर मी त्यांना कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावले. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो", असे पायल म्हणाली.

  • अनुरागने फेटाळले पायल घोषचे आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतके खोटे बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतले. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असे ट्विट अनुराग कश्यपने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...