आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड कलाकरांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच:अमिताभ बच्चन यांचा कोरोना वॉरियर्सला सलाम, अक्षय कुमारने केले फेरीवाल्यांना मदत करण्याचे आवाहन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यावरची एक सुंदर कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे
  • अक्षय कुमारने फेरीवाल्यांना मदतीचे आवाहन करताना लिहिले - त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका

आज देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना आणि देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • बिग बींनी कोरोना वॉरियर्सना केला सलाम

महानायक अमिताभ बच्चन यांनी यानिमित्ताने एक कविता शेअर केली आणि कोरोनाविरुद्ध लढणार्‍या लोकांचे आभार मानले. बिग बींनी ट्विटमध्ये लिहिले, ‘कोरोना विरोधात लढा देणाऱ्या जवानांना माझा सलाम आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या या शुभदिनी शांती, समृद्धीच्या शुभेच्छा’, असे त्यांनी म्हटले आहे. बिग बींनी 'आज से आजाद अपना देश फिर से' या शीर्षकाची कविता शेअर केली आहे.

अक्षयने गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रस्त्यावरील फेरीवाले, भाजीपाला-चहाची दुकाने, छोट्या-छोट्या विक्रेत्यांना मदत करण्याचे आवाहन करत आहे. ज्यांच्या रोजीरोटीवर कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे परिणाम झाला आहे.

अजय देवगणचा 'तान्हाजी' सलाम

अभिनेता अजय देवगनने आपल्या शैलीत शूर सैनिकांना सलाम केला आहे. त्याने लिहिले, "74 व्या स्वातंत्र्य दिनी प्रत्येक वीर आणि अनसंग हीरोंना तान्हाजी सलाम करतो."

लता मंगेशकर यांनी गाणे शेअर केले स्वर कोकिळा लता मंगेशकर यांनी त्यांच्या 'सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा' या गाण्याची यूट्यूब लिंक शेअर करुन देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले, "नमस्कार, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद."

त्याचप्रमाणे अनुपम खेर, विक्की कौशल, स्वरा भास्कर, सुनील ग्रोव्हर यांच्यासह इतरही अनेक सेलिब्रिटींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुपम खेर यांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

मेरे प्यारे दोस्तों! निम्न वर्गीय परिवार से आने के बावजूद मैंने अपने सपनों को हमेशा आसमान के आसपास ही रखा।अब एक नया सपना! अपने डिजिटलप् लेटफ़ॉर्म पर मेरे जीवन की कहानी।ज़रूर देखियेगा।आपके प्यार ने बहुत शक्ति दी है।धन्यवाद!आपका अनुपम।🙏😍https://t.co/qESpl8z92y #KuchBhiHoSaktaHai pic.twitter.com/caKvdLTToP

— Anupam Kher (@AnupamPKher) June 7, 2020 r /> विक्की कौशलने लिहिले- 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

स्वरा भास्करने लिहिले- सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुनील ग्रोव्हरने लिहिले- स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला अभिमान आहे की आपण भारतीय आहोत.

बातम्या आणखी आहेत...