आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवंगत अभिनेता इरफान खानची आज जयंती आहे. 29 एप्रिल 2020 रोजी इरफानचे निधन झाले होते. त्याच्या बर्थ अॅनिव्हर्सरीनिमित्त त्याचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांनी त्याच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. इरफानचा मुलगा बाबिलने त्याच्या आठवणीत एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यासह त्याने एक भावनिक नोटही लिहिली आहे.
बाबिलने लिहिले...
व्हिडिओ शेअर करताना बाबिलने लिहिले की, 'तुम्ही कधीही लग्न, जन्म याचा उत्सव करावा या विचारसरणीचे कधीच नव्हता. कदाचित म्हणूनच मला कोणाचा वाढदिवस लक्षात राहत नाही कारण तुम्हाला कधी माझा वाढदिवस लक्षात राहिला नाही. तुम्ही माझा वाढदिवस लक्षात रहावा म्हणून कधी उत्साह दाखवल्याचंही मला आठवत नाही. बाहेरच्यांना हे कितीही विचित्र वाटत असलं तरी आमच्यासाठी ते अगदीच सर्वसामान्य होतं. आम्ही दररोजचा दिवस साजरा करायचो. आई नेहमी आपल्याला वाढदिवसाची आठवण करून द्यायची. पण आजचा तुमचा वाढदिवस मी कधीच विसरू शकत नाही. आज तुमचा वाढदिवस आहे बाबा. तंत्रज्ञानात कमकुवत असलेल्या सर्व पालकांसाठी खास प्रेम.. पाहा ते मला अजूनही सांगत आहेत की त्यांना माझी आठवण येते.'
इरफानचे जाणे 2020 चे सर्वात मोठे नुकसान - शूजित सरकार
2015 मध्ये रिलीज झालेल्या इरफानच्या पीकू या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार यांनी त्याच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले, 'पिकू चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी इरफान म्हणाला, दादा आपण असेच शूट सुरू ठेवू शकत नाही का? मला इथे मुक्त पक्षी असल्यासारखे वाटत आहे. हा क्षण इथे थांबवण्याची माझी इच्छा नाही. सेटवर तुम्ही माझ्याकडून कोणतही काम करून घ्या. दादा, आपण असेच पुढे पुढे जाऊ शकत नाही का?”
ते पुढे म्हणाले, 'इरफान आता आपल्यात नाही. 2020 चे सर्वात मोठे नुकसान कोणते? असे जर तुम्ही मला विचारले तर मी सांगेन, इरफान खानचे जाणे हे फिल्म इंडस्ट्रीचे 2020 चे सर्वात मोठे नुकसान आहे. इरफान जिथे कुठे असेल तिथे आनंदी असेल,' इरफानबद्दल सांगताना शूजित भावूक झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.