आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'KGF-चैप्टर 2':अभिनेता यश म्हणाला- गेली 4 वर्षे मी रॉकीची भूमिका जगतोय, त्याच्याशी संबंधित ब-याच गोष्टी माझ्यात आपोआप आल्या

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यशने मागील 4 वर्षांपासून तो रॉकीची भूमिका कशी जगतोय, हे सांगितले आहे.

'KGF-चैप्टर 2' या आगामी चित्रपटाचा टीझर गुरुवारी (7 जानेवारी) रिलीज झाला आहे. सुरुवातीला हा टीझर या चित्रपटातील मुख्य भूमिका यशच्या 35 व्या वाढदिवशी म्हणजे 8 जानेवारी रोजी रिलीज करण्यात येणार होता. मात्र चाहत्यांची मागणी बघता शेवटच्या क्षणी त्याची रिलीज डेट बदलण्यात आली. चित्रपटाचा टीझर प्रेमक्षकांच्या पसंतीला पडला आहे. यानिमित्ताने यशने मागील 4 वर्षांपासून तो रॉकीची भूमिका कशी जगतोय, हे सांगितले आहे.

रॉकीचे पात्र गेल्या 4 वर्षांपासून जगतोय
अभिनेता यश म्हणाला, "मी गेल्या चार वर्षांपासून या व्यक्तिरेखेमध्ये (हसून) जगत आहे. अगदी सांगायचं झालं तर मी रॉकीची भूमिका वठवता वठवता ते पात्र मी जगू लागलो आणि त्या पात्राशी संबंधित अशा बर्‍याच गोष्टी माझ्यात आपोआप आल्या आहेत. प्रत्यक्षात मला खूप तयारी करायची नव्हती. चॅप्टर 2 मध्ये बरेच रोमांचक आणि आव्हानात्मक सिक्वेन्स आहेत. त्यापैकी एकाविषयी सांगणे कठीण आहे. मी चित्रपटाच्या रिलीजनंतर त्या प्रश्नाचे उत्तर देईन," असे यशने सांगितले.

तो पुढे म्हणाले, "'KGF चैप्टर 1' पेक्षा दुस-या भागात रॉकीचे पात्र वेगळे असेल. यात बरीच अॅक्शन आणि इमोशनल गोष्टी असतील ज्या नक्कीच प्रेक्षकांना पसंत पडतील. यासोबत यशने संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला." चॅप्टर 2 मध्ये यश व्यतिरिक्त संजय आणि रवीना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

संजय-रवीनासोबत काम करताना आनंद झाला
यश म्हणाला, "संजय सर आणि रवीना मॅम या दोघींबरोबर काम करताना खूप मजा आली. जिद्दीने आणि धैर्याने आपण कसे काम करु शकतो, याचे संजय दत्त सर एक उत्तम उदाहरण आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तब्येत खराब असूनही त्यांनी केलेली भूमिका प्रेरणादायक आहे. रवीना मॅम एक अष्टपैलू आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. त्यांच्या उपस्थितीने सेटवर एक वेगळ्याच प्रकारची उर्जा असायची. या दोघांसोबत काम करण्याचा हा एक चांगला अनुभव होता."

‘केजीएफ चॅप्टर -1’ बनवले होते अनेक रेकॉर्ड
2018 मध्ये आलेल्या ‘केजीएफ चॅप्टर -1’ने बॉक्‍स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. कन्नड, तामिळ, तेलुगु आणि हिंदीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. हा पहिली कन्नड चित्रपट होता, ज्याने 250 कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर सर्वाधिक कमाई करणारा हिंदीत डब झालेला हा चौथा चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे यशला खूप प्रसिद्धी मिळाली होती. यामुळे या चित्रपटाच्या सिक्‍वेलची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा सिक्वेल कन्नड, हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...