आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना शुक्रवारी रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अटक केली आहे. या दोघांच्या अटकेनंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानी मुंबई पोलिसांच्या चौकशीवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अभिनेत्याच्या डॉक्टरांनी मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखती या नियमाविरूद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सुशांतची आई मानसिकरीत्या आजारी असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वकील विकास सिंह म्हणाले - एनसीबीच्या अटक कारवाईनंतर सुशांतच्या कुटुंबीयांना वाटत असलेली भीती खरी ठरली आहे. मुंबई पोलिस काहीतरी लपवत आहेत, असा संशय सुरुवातीपासून सुशांतच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. तो खरा ठरला आहे. जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे सरकेल, तशा अनेक गोष्टी उघड होती, असे ते म्हणाले आहेत.
विकास सिंह यांनी सुशांतच्या मानसिक आरोग्याविषयी टीव्ही चॅनेल्सवर बसून चर्चा करणा-या मानसोपचारतज्ज्ञांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे काही नियम आहेत, ज्याअंतर्गत कोणताही डॉक्टर आपल्या रूग्णाचे मानसिक आरोग्याविषयी सर्वांसमोर बोलू शकत नाही. सुशांतच्या बाबतीत, कोणताही डॉक्टर हे करू शकत नाही. सुशांत आता आपल्यात नाही. जर कुणालाही सुशांतविषयी काही मांडायचे असेल तर त्यांनी सर्वप्रथम लीगल हेड म्हणजे सुशांतच्या वडिलांची परवानगी घ्यायला हवी.
विकास सिंह म्हणाले की, सुशांतच्या आईचे निधन मानसिक आरोग्य ठिक नसल्याने झाल्याचे अनेक डॉक्टर म्हणत आहेत. पण हे चुकीचे आहे. त्यांचे निधन ब्रेन हॅमरेजमुळे झाले होते, असा खुलासा त्यांनी केला.
याशिवाय इटलीमधील एका हॉटेलमधील एक पेटिंग बघितल्यानंतर सुशांतचे मानसिक आरोग्य खूप बिघडले होते असा दावा रिया चक्रवर्तीने केले होता. तिने सांगितल्यानुसार, गोया नावाच्या एका प्रसिद्ध चित्रकाराचे पेंटिंग तिथे होते. ज्यात एक राक्षस एका मुलाला खातानाचे चित्र रेखाटले होते. ती पेंटिंग पाहून सुशांत खूप घाबरला होता आणि त्याला त्या पेंटिंगमधले भूत दिसत होते, असे रिया म्हणाली होती. विकास सिंह यांनी सांगितले की, आमच्या टीमने तिथे चौकशी केली असता, तिथे तसे कुठलेही पेटिंग आढळले नाही. जर ती पेटिंग असली तरीही आजच्या काळात त्यापासून मानसिक आजार होत नाही. जूनमध्ये घडलेल्या या घटनेचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे सिंह यांनी म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.