आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज (8 जून) तिचा 46 वा वाढदिवस साजर करीत आहेत. या निमित्ताने तिचे पती राज कुंद्रा यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच त्यांनी शिल्पासाठी एक प्रेमळ पोस्टही लिहिली आहे.
आपल्या मेसेजमध्ये राज यांनी लिहिले, 'माझी प्रिय पत्नी, तू माझ्यातील उणीवा तुझ्या प्रेमाने दूर केल्या. फक्त तुला हसताना बघून वाईट दिवसही चांगला ठरतो, हेच तुझे महत्त्व आहे. तू फक्त माझ्या मुलांची आईच नाही, तर माझ्या आयुष्याची राणी आहेस. मी शब्दांपलीकडे तुझ्यावर प्रेम करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझा पती'. यावर शिल्पाने Awwwwwww अशी प्रतिक्रिया दिली.
या खास दिवसाच्या निमित्ताने राज यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहेत, त्यात या जोडप्याची विविध छायाचित्रे बघायला मिळतात. व्हिडीओत एक मेसेजही दिसतोय. तो मेसेज काहीसा असा...
'To my angel, You gave meaning to my life
No fairy tale can, Compare to the love story that we share
Our love story is full of joy, love and always holding each other near
Wishing you a very Happy Birthday, Yours Truly Yours Life Partner.'
View this post on InstagramA post shared by Raj Kundra (@rajkundra9) on Jun 7, 2020 at 11:30am PDT
राज यांच्या पोस्टवर करणवीर बोहरा, आयशा श्रॉफ, अनिता हसनंदानी, केन घोष, सारा खानसह अनेक सेलिब्रिटींनीही शिल्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पाचा जन्म 8 जून 1975 रोजी झाला होता. 22 नोव्हेंबर 2009 रोजी तिचे राज कुंद्राशी लग्न झाले होते. शिल्पाला दोन मुले आहेत, मुलगा वियान 8 वर्षांचा आहे, तर मुलगी चार महिन्यांची आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.