आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • On The Death Of Anupam Shyam Ojha His Brother Anurag Said – His Condition Deteriorated Due To Drinking More Water During Shooting, Was On Ventilator For 6 Days

इंटरव्ह्यू:अनुपम श्याम यांच्या निधनावर भाऊ अनुराग, म्हणाले - शूटिंग दरम्यान जास्त पाणी पिल्याने त्यांची प्रकृती बिघडली, 6 दिवस व्हेंटिलेटरवर होते

किरण जैन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुपम यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले होते आणि त्यांना श्वास घेता येत नव्हता

ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम ओझा यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. 63 वर्षीय अनुपम मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होते. मात्र, गेल्या 6 दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. काल रात्री त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या जगण्याची आशा सोडली होती. दैनिक भास्करसोबतच्या खास बातचीतमध्ये अनुपम यांचे भाऊ अनुराग श्याम यांनी सांगितले की, जास्त पाणी प्यायल्याने त्यांच्या भावाची प्रकृती बिघडली होती.

अनुपम यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले होते आणि त्यांना श्वास घेता येत नव्हता
अनुराग श्याम सांगतात, "गेल्या आठवड्यात शूटिंग दरम्यान, अनुपम खूप पाणी प्यायले, ज्यामुळे त्यांच्या किडनीवर परिणाम झाला. आठवड्यातून तीनदा त्यांचे डायलिसिस व्हायचे आणि या काळात त्यांना जास्त पाणी प्यायचे नव्हते. त्यांच्या फुफ्फुसात खूप पाणी जमा झाले होते. आणि त्यामुळे त्यांना श्वास घेता येत नव्हता. त्यांची प्रकृती इतकी गंभीर झाली की त्यांना ताबडतोब व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. गेले 6 दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. काल रात्री 11 च्या सुमारास त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. आणि त्यांनी रात्री 1 वाजता अखेरचा श्वास घेतला."

अनुपमला शूटिंगची आवड होती
अनुराग श्याम पुढे सांगतात, "अनुपम यांना खूप वेदना होत होत्या. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी ते मला म्हणाले होते - भैया, मला श्वास घेता येत नाहीये. त्यांना शूटिंगची खूप आवड होती. जेव्हा त्यांना टीव्ही शो 'प्रतिज्ञा'मध्ये काम मिळाले होते, तेव्हा जणू त्यांना नवीन आयुष्य मिळाले होते. ते खूप आनंदी होते. मला आठवतं, जेव्हा त्यांनी त्यांच्या शोचा पहिला भाग पाहिला होता, ज्यामध्ये त्यांची एंट्री झाली होती. त्यावेळी ते आपला आनंद शब्दांत सांगू शकत नव्हते."

अनुपम लॉकडाऊनमध्ये आपले काम खूप मिस करत होते
अनुराग पुढे म्हणाले, "अनुपम लॉकडाऊनमध्ये आपल्या कामाला खूप मिस करत होते. शूटसाठी ते बाहेर जाऊ शकत नव्हते, तेव्हा त्यांनी माझ्याबरोबर बाहेर जाण्याचा आग्रह धरला होता. पण, बाहेर जाणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नव्हते, म्हणूनच मी नकार दिला होता.'

बातम्या आणखी आहेत...