आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॅकलिनच्या मनाचा मोठेपणा:दसऱ्याच्या निमित्ताने जॅकलिनने ‘या’ खास व्यक्तीला दिली कार भेट, सेटवर केली कारची पूजा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याआधीही तिने तिच्या मेकअप मनलासुद्धा कार गिफ्ट दिली होती.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळे चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. ती नेहमीच आपल्या खास आणि जवळच्या व्यक्तींना काहीना काही भेटवस्तू देत असते. यंदा तिने दसऱ्याचा मुहूर्त साधत आपल्या एका स्टाफ मेंबरला चक्क कार भेट दिली आहे.

जॅकलिनच्या या गिफ्टने तिचा स्टाफ मेंबर प्रचंड खुश झाला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओत जॅकलिन या कारची पूजा करून, स्टाफ मेंबरला नवीन कारची किल्ली देताना दिसतेय. जॅकलिनने या स्टाफ मेंबरसाठी गाडी बुक केली होती. मात्र, तिची डिलिव्हरी कधी होणार हे तिलादेखील निश्चितपणे माहित नव्हते. त्यामुळे तिच्या चित्रपटाच्या सेटवरच या गाडीची अचानकपणे डिलिव्हरी झाली.

सध्या जॅकलिन तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असतानाच ही गाडी सेटवर आली. त्यावेळी तिने चित्रपटातील भूमिकेत म्हणजे एका वाहतूक पोलिसांच्या वेशात होती. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असल्यामुळे जॅकलिनने वाहतूक पोलिसांच्या वेशातच या गाडीची पूजा केली आणि तिच्या स्टाफ मेंबरला ती गिफ्ट केली. जॅकलिन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती, तेव्हापासून हा स्टाफ मेंबर तिच्यासोबत आहे. याआधीही तिने तिच्या मेकअप मनलासुद्धा कार गिफ्ट दिली होती.

हे आहेत जॅकलिनचे आगामी प्रोजेक्ट

येत्या 4 नोव्हेंबरपासून जॅकलिन भूत पुलिस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. डलहौसीमध्ये या चित्रपटाचे 45 दिवसांचे शेड्यूल असेल. सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम या चित्रपटात जॅकलिनसह मुख्य भूमिकेत आहेत. 'भूत पुलिस' या चित्रपटाव्यतिरिक्त जॅकलिन रोहित शेट्टीच्या 'सर्कस'मध्येही रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. सूत्रांनी सांगितले, चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन येत्या आठवड्यापासून सुरु होणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी डलहौसीला जाण्यापूर्वी जॅकलिन याचे वाचन सत्र पूर्ण करणार आहे. यात ती 'अंगूर'मधील मौसमी चॅटर्जी यांची भूमिका मॉर्डन रोलमध्ये सादर करणार आहे. या दोघांव्यतिरिक्त जुन्या 'अर्थ'च्या रिमेक मध्येही जॅकलिन असल्याची बातमी आहे. मात्र आता त्यात काही बदल करण्यात आला आहे. त्याचे निर्माते चेन्नईमध्ये शूटिंग करणार आहेत. दक्षिणेची रेवती याचे दिग्दर्शन करणार आहे. जॅकलिनच्या तारखांमुळे सध्या गोंधळ उडाला आहे. त्यामुळे तिच्या जागी दुस-या कुणालाही घेतले जाऊ शकते.