आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी भूमिकेची:'ब्लर'च्या सेटवर पात्राच्या तयारीसाठी तापसी पन्नूने घेतला डोळ्यांवर पट्टी बांधून राहण्याचा निर्णय!

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोस्टर रिलीज झाल्यापासूनच या रंजक कथेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

'रश्मी रॉकेट'नंतर अभिनेत्री तापसी पन्नू तिचा आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर 'ब्लर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू असून ब्लरमधील तिच्या भागाचे शूटिंग तिने पूर्ण केले आहे.

तापसीने तिच्या व्यक्तिरेखेच्या अभ्यासासाठी 12 तास डोळ्यांवर पट्टी बांधली आणि सेटवरील सर्वांनी तिची प्रशंसा केली. सूत्रांनी सांगितल्यानुसार, "तापसीने तिच्या व्यक्तिरेखेच्या भावना समजून घेण्यासाठी तिने 12 तास डोळ्यांवर पट्टी बांधून राहण्याचा निर्णय घेतला. सकाळी 7 वाजल्यापासून तिने तिच्या डोळ्यांवर कपड्याची पट्टी बांधली आणि दिवसभरातील सर्व कामे पार पाडलीत. डोळ्यावर पट्टी बांधूनच फोन कॉल्सला उत्तर देणे, खाणे, क्रू, कलाकार आणि चित्रपटाच्या टीमशी बोलणे असे सर्व तिने केले."

पोस्टर रिलीज झाल्यापासूनच या रंजक कथेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ब्लरला मनोरंजक सामाजिक संदर्भासह पॉवर-पॅक केलेले मनोरंजन म्हणून ओळखले जात आहे.

अजय बहल दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज, आउटसाइडर्स फिल्म्स आणि इकेलॉन प्रॉडक्शन यांनी संयुक्तपणे निर्मित केलेला 'ब्लर' हा आगामी हिंदी थ्रिलर पट आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि गुलशन देवय्या मुख्य भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...