आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • One Month For Sushant Singh Rajput Suicide| Rhea Chakraborty Pennd Emotional Note For Late Sushant Singh Rajput After One Month His Death

सुशांतच्या निधनाला एक महिना पूर्ण:रिया चक्रवर्तीने भावनांना मोकळी करुन दिली वाट, इंस्टाग्रामवर लिहिले - '30 दिवस तुझ्याशिवाय... पण आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहणार'

मुंबई4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
 • श्वास कोंडून त्याचा मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात समोर आले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने महिन्याभरापूर्वी म्हणजे 14 जून रोजी आत्महत्या करुन या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. सुशांतने आत्महत्या केली हे स्वीकारायला अद्याप त्याचे चाहते यार नाहीत. या महिन्याभरात अनेक चर्चांना उधाण आले. बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन वादंग पेटले. इतकेच नाही तर त्याच्या खासगी आयुष्यावरुनही बरीच चर्चा झाली.

या काळात एका नावाची बरीच चर्चा झाली आणि ते नाव म्हणजे त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती. सुशांतच्या निधनाच्या काही दिवसाआधी रिया त्याचे घर सोडून गेली होती. त्याच्या निधनानंतर रिया सोशल मीडियापासून लांब होती. पण आज तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. रियाने सुशांतसाठी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

 • पोस्टमध्ये रियाने व्यक्त केल्या भावना

रियाने सुशांतसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यात दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. रियाने लिहिले - "अजूनही मी माझ्या भावनांशी झगडत आहे. माझ्या अंतःकरणात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तू मला प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवले. त्याची ताकद काय असते ते सांगितले. साधे गणिताचे कोडे आयुष्याचा अर्थ कसे उलगडू शकेल हे शिकविले आणि मी तुला वचन देते की मी दररोज तुझ्याकडून हे शिकत राहणार आहे. 

एक चांगला व्यक्ती म्हणून तू सर्वकाही होतास.. जगाने पाहिलेले आश्चर्य होतास. मला माहितीय तू आता खुप जास्त निवांत आयुष्य जगतोय. हे आकाश, हे चंद्र-तारे सर्वच तुझे म्हणजेच एका महान भौतिकशास्त्रज्ञाचे मोठ्या उत्साहात स्वागत करत असणार. मी माझ्या शूटिंग स्टारची वाट पाहत आहे, जो तुला माझ्याकडे परत आणण्याची माझी इच्छा पूर्ण करू शकेल.

आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी माझे शब्द अपुरे आहेत. आणि मला माहितेय की, तुला याचा अर्थ माहित होता. तूच मला सांगितले होते की, याचा अर्थ काय आहे हे आपल्याला माहित आहे. तू मोकळ्या मनाने सर्वांना पसंत करायचा आणि आता आपल्यातील हे प्रेम खरोखरंच वाढत आहे हे तू मला दाखवले आहे. 

शांततेत राहा सुशी. तुला गमावून 30 दिवस उलटून गेले, परंतु आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहणार आहे... माझ्याशी कायम जुळून रहा. अनंत दिशेने आणि त्यानंतरही."

 • एक दिवस आधी व्हॉट्सअ‍ॅप डीपी बदलला

याशिवाय रियाने एक दिवस आधी तिच्या व्हॉट्सअप डीपीवर सुशांतसोबतचा फोटो लावला होता. यात ते दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. रियाने जो फोटो डीपीवर लावला आहे, तो सुशांतने सोशल मीडियावर शेअर केला होता. 

 • रियाची 11 तास चौकशी झाली होती 

सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात मुंबईत पोलिसांनी 11 तास रिया चक्रवर्तीची चौकशी केली होती. पोलिसांनी रियाला सुशांतसोबतचे तिचे नाते, भांडणं, फोन कॉल्स, मेसेजस आणि सुशांतच्या नैराश्याबद्दल प्रश्न विचारले होते. तसेच रियाचा भाऊ सोविज चक्रवर्ती याचीही पोलिसांनी चौकशी केली होती. रिया आणि सोविझ दोघेही सुशांतच्या तीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये संचालक आणि अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत होते.

 • रिया-सुशांत लग्न करणार होते

सुशांत आणि रियाच्या लग्नाची बातमी रियाचा प्रॉपर्टी डीलर सनी सिंगने दिली होती. दोघेही यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार होते, त्यासाठी ते मुंबईत घराच्या शोधात होते, असे सनी सिंगने सांगितले होते.

 • महेश भट्ट यांच्या सांगण्यावरुन रियाने सोडली होती सुशांतची साथ?

चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्याबरोबर काम करणार्‍या लेखिका सुहृता सेनगुप्ता यांनी  खळबळजनक खुलासा केला होता. सुशांतच्या नैराश्याविषयी समजताच तू त्याच्यासोबत राहू नको असा सल्ला महेश भट्ट यांनी रियाला दिल्याचे सुहृता सेनगुप्ता यांनी म्हटले होते.