आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:बोनी कपूर यांच्या घरातील आणखी दोन सदस्यांना कोरोनाची लागण, दोन दिवसांपूर्वीच एकाचा रिपोर्ट आला होाता पॉझिटिव्ह

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोनी कपूर यांच्या घरी काम करणा-या एकूण तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते.
  • बोनी त्यांच्या मुली आणि इतर सदस्यांसमवेत क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबई चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या घरी काम करणा-या आणखी दोन सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे दोघेही कपूर कुटुंबीयांसोबतच राहतात. ओशिवरा पोलिस ठाण्याचे पीआय दयानंद बांगर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र स्वतः बोनी यांनी याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

  • 2 दिवसांपूर्वीच एका सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता

2 दिवसांपूर्वी बोनी यांनी एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करुन त्यांच्या घरी काम करणा-या 23 वर्षीय चरण साहू या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते.  बोनी म्हणाले होते की, 16 मेच्या संध्याकाळपासून चरणची प्रकृती खालावली. आम्ही त्याला कोरोना चाचणीसाठी पाठवले आणि आयसोलेशनमध्येही ठेवले.  रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर याची माहिती महापालिकेला दिली. त्यानंतर लगेचच चरणला क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात आले.

बोनी यांची मुलगी जान्हवीने तिच्या वडिलांचे अधिकृत निवेदन सोशल मीडियावर शेअर केले.
बोनी यांची मुलगी जान्हवीने तिच्या वडिलांचे अधिकृत निवेदन सोशल मीडियावर शेअर केले.
  • होम क्वारंटाईन आहे कपूर कुटुंबीय

बोनी यांनी 19 मे रोजी सोशल मीडियावर लिहिले होते की, 'मी, माझी मुले आणि बाकीचे सदस्य ठिक आहोत आणि आम्हाला कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आम्ही आमच्या घराबाहेरही गेलो नाही. आता आम्ही पुढील 14 दिवस सेल्फ-क्वारंटाईनमध्ये राहू. आम्ही बीएमसीच्या मेडिकल टीमकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करू. तसेच, महाराष्ट्र सरकार व महानगरपालिकेच्या तत्काळ प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. मी ही माहिती देत ​​आहे, कारण अफवा पसरायला नकोत. आम्ही सर्व सुरक्षात्मक उपाय करीत आहोत. आम्हाला आशा आहे की चरण बरा होईल आणि घरी परत येईल.'

बातम्या आणखी आहेत...