आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लायगर'चे कलेक्शन गुंडाळले:'मशीन' बघण्यासाठी पोहोचला होता केवळ एकच प्रेक्षक, चित्रपटांमुळे जितेंद्र, राज कपूर झाले होते कंगाल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लायगर' हा चित्रपट पहिल्या वीकेंडला केवळ 36 कोटींची कमाई करू शकला. आतापर्यंतचे कलेक्शन पाहता हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा ओलांडू शकणार नाही असे दिसते. दुसरीकडे, आमिर खानचा लाल सिंग चड्ढा रिलीजच्या दोन आठवड्यांनंतरही केवळ 57 कोटींची कमाई करू शकला आहे, तब्बल 170 कोटींच्या बिग बजेटमध्ये हा चित्रपट तयार झाला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर निर्मात्यांना 110 कोटींचा फटका बसला आहे. शमशेरा, सम्राट पृथ्वीराजसारखे बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. 200 कोटींमध्ये बनलेला सम्राट पृथ्वीराज केवळ 90 कोटींची कमाई करू शकला, तर 150 कोटींमध्ये बनलेल्या शमशेराने केवळ 40 कोटींचा गल्ला जमवला. खरं तर चित्रपट हिट ठरल्याने अभिनेत्यांचे नशीब पालटत असते, तर चित्रपट फ्लॉप झाल्याने मात्र निर्मात्यांना करोडोंचे नुकसान सोसावे लागते. काही तर उद्धवस्त होऊन जातात.

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत, जे प्रेक्षकांनी नाकारले. एकीकडे राज कपूर यांचा ड्रीम चित्रपट 'मेरा नाम जोकर' फ्लॉप ठरला आणि ते कर्जात बुडाले. तर 'कागज के फूल' चित्रपटाच्या अपयशामुळे गुरु दत्त नैराश्यात गेले आणि त्यांनी पुन्हा कोणताही चित्रपट दिग्दर्शित केला नाही. अशाच काही चित्रपटांवर नजर टाकुया-

'धाकड'चे सर्व शो रद्द करण्यात आले

कंगना रनोटचा 'धाकड' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत हा चित्रपट देशातील 300 चित्रपटगृहांमधून हटवण्यात आला. 2100 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात केवळ 25 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आणि दोन दिवसांनी त्याचे शो रद्द करण्यात आले. हा चित्रपट 80 कोटींच्या बिग बजेटमध्ये बनला होता, पण त्याने केवळ 3.5 कोटीच कमावले होते.

'मशिन' चित्रपट बघायला पोहोचली होती केवळ एक व्यक्ती

2017 मध्ये रिलीज झालेला अब्बास-मस्तानचा 'मशीन' हा चित्रपट मोठा फ्लॉप ठरला. अब्बास बर्मावाला यांनी त्यांचा मुलगा मुस्तफाला या चित्रपटातून लाँच केले होते. सुरुवातीच्या शोमध्ये चित्रपटाला इतका वाईट प्रतिसाद मिळाला की PVR मध्ये फक्त एकच व्यक्ती चित्रपट पाहण्यासाठी आला होता. यानंतर एकही व्यक्ती आली नाही, त्यामुळे चित्रपट पडद्यावरून हटवण्यात आला. 30 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने एकूण 2 कोटींचा व्यवसाय केला होता.

'मेरा नाम जोकर'मुळे राज कपूर यांना बसला होता मोठा धक्का

सहा वर्षांत तयार झालेला 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. हा चित्रपट बनवण्यासाठी राज कपूर यांनी पत्नी कृष्णाचे सर्व दागिने गहाण ठेवले आणि मोठे कर्ज घेतले होते. 4 तासांमध्ये बनलेला हा चित्रपट भारतातील सर्वात लांब चित्रपटांपैकी एक होता, ज्यामध्ये दोन इंटरव्हल ठेवण्यात आले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि राज कपूर प्रचंड कर्जात बुडाले. तोट्यातून सावरण्यासाठी राज कपूर यांना बॉबी हा चित्रपट करावा लागला. मोठ्या अभिनेत्याला कास्ट करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी मुलगा ऋषी कपूरला कास्ट केले होते.

'द्रोणा' फ्लॉप झाल्याने अभिषेकला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले

2008 साली प्रदर्शित झालेला अभिषेक बच्चन स्टारर सुपरहिरो चित्रपट 'द्रोणा' फ्लॉप ठरला होता. 45 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट केवळ 15 कोटींची कमाई करू शकला होता. बॉक्स ऑफिसवरील चित्रपटाची अवस्था पाहिल्यानंतर अभिषेक बच्चनला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले होते. 60 VFX तज्ज्ञांनी चित्रपट बनवण्यासाठी 6 महिने मेहनत घेतली होती. 250 व्हिज्युअल आर्टिस्ट, चित्रकार, डिझायनर आणि डेव्हलपर्स यांच्या मेहनतीनंतरही हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला होता.

'कागज के फुल'मुळे उद्धस्त झाले होते गुरुदत्त, परत कधीही दिग्दर्शित केला नाही चित्रपट

1959 मध्ये आलेला 'कागज के फूल' हा चित्रपट आज कल्ट क्लासिकल चित्रपटांच्या यादीत गणला जातो, मात्र रिलीजनंतर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. गुरु दत्त यांनी त्यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, मात्र या चित्रपटातून त्यांना 17 कोटींचे नुकसान झाले होते. गुरू दत्त यांनी त्यांच्या आणि वहिदा रेहमानच्या अपूर्ण प्रेमकथेवर हा चित्रपट बनवला होता, असे म्हटले जाते. मोठ्या तोट्यानंतर गुरु दत्त यांचे प्रोडक्शन हाऊस उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आले. त्यानंतर गुरुदत्त यांनी कधीही चित्रपट दिग्दर्शित केला नाही. आर्थिक हलाखीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर गुरू दत्त नैराश्यात गेले आणि त्यांना दारूचे व्यसन जडले.

'आचार्य' फ्लॉप झाल्याने चिरंजीवी यांनी परत केले होते मानधन

2022 मध्ये आलेला 'आचार्य' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. 140 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट केवळ 70 कोटींची कमाई करू शकला. मुख्य कलाकार चिरंजीवी आणि रामचरण यांनी निर्मात्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी त्यांची अर्धी फी निर्मात्यांना परत केली होती. दिग्दर्शकानेही फी परत केली होती.

'सूर्यवंशम' चित्रपटानंतर अमिताभ यांनी साकारली नाही तरुण अभिनेत्याची भूमिका

1999 मध्ये रिलीज झालेल्या 'सूर्यवंशम' या चित्रपटात अमिताभ यांची दुहेरी भूमिका होती. एक भूमिका वडील ठाकूर भानुप्रताप सिंह यांची होती आणि दुसरी भूमिका हीरा ठाकूर यांची होती. वडिलांच्या भूमिकेत बिग बींना चांगलीच पसंती मिळाली होती, मात्र तरुण हीरा ठाकूरवर लोकांनी खूप टीका केली होती. बिग बींवर इतकी टीका झाली की, या चित्रपटानंतर त्यांनी तरुण अभिनेत्याची भूमिका करणे टाळले. त्यानंतर पुढच्याच वर्षी बिग बी 'मोहब्बतें' चित्रपटात सरळ पांढऱ्या दाढीच्या पात्रात दिसले.

'दीदार-ए-यार' चित्रपट केल्यानंतर कंगाल झाले होते जितेंद्र

1972-74 च्या दरम्यान जितेंद्र यांना चित्रपटात काम मिळणे जवळपास बंद झाले होते. काम मिळणे बंद झाल्यानंतर 1982 मध्ये जितेंद्र आंनी आपल्या सर्व ठेवी गुंतवून 'दीदार-ए-यार' हा चित्रपट बनवला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला आणि यामुळे त्यांना तब्बल 2.5 कोटींचा तोटा झाला. ही त्यावेळी खूप मोठी रक्कम होती. चित्रपटात रेखाची उपस्थिती असूनही टीना मुनीमला मुख्य भूमिका देण्यात आली होती. तोट्यातून सावरण्यासाठी जितेंद्र यांनी एकापाठोपाठ एक 60 चित्रपट केले होते.

बातम्या आणखी आहेत...