आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री कंगना रनोट अडचणीत:19 एप्रिलला भटिंडा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; वृद्धेवर 100 रुपये घेऊन धरणे आंदोलनात सहभागी होणारी महिला म्हणून केली होती टीका

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाली होती कंगना रनोट?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट अडचणीत सापडली आहे. तिला 19 एप्रिलला भटिंडा न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 100 रुपयांसाठी आंदोलनात सहभागी होणारी वृद्ध महिला असे म्हणत महिंदर कौर यांच्यावर टीका केली होती. 87 वर्षीय महिंदर कौर या भटिंडातील बहादुरगढ जंदिया गावातील रहिवाशी आहेत. त्यानंतर महिंदर कौर यांनी कंगनाविरोधात भटिंडा कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला.

13 महिने झाली सुनावणी
वृद्ध शेतकरी महिला महिंदर कौर यांचे वकील रघबीर सिंह बहनीवाल यांनी सांगितले की, 4 जानेवारी 2021 रोजी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. ज्याची सुनावणी जवळपास 13 महिने चालली. आता कोर्टाने कंगनाला समन्स बजावले आहे. तिला न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

याच मुद्द्यावरून काही महिन्यांपूर्वी कंगना रनोटला पंजाबमधील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता.
याच मुद्द्यावरून काही महिन्यांपूर्वी कंगना रनोटला पंजाबमधील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता.

काय म्हणाली होती कंगना रनोट?

दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध शेतकरी आणि त्यांची कुटुंबे सामील झाली होती. यात सामील एक वर्षीय वृद्ध महिला, ज्यांना सगळे ‘दादी’ म्हणतात, त्यांच्यावरच कंगनाने टीका केली होती. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘हा..हा..हा.. या त्याच दादी आहेत, ज्यांना टाईम मॅगझिनने सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये सामील केले आहे. या आता 100 रुपयांत उपलब्ध आहेत. पाकिस्तानी पत्रकार भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कुप्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला असे लोक हवे आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्यासाठी आवाज उठवू शकतील.’ या पोस्टनंतर तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. बिल्किस बानो म्हणून कंगनाने मोहिंदर कौर यांचे नाव घेतले होते. कंगनाच्या या ट्वीटमुळे मानसिक त्रास झाल्याचे महिंदर कौर यांनी म्हटले होते. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, शेजारी, ग्रामस्थ आणि सर्वसामान्यांमध्ये त्यांची प्रतिमा दुखावली गेली आहे.

कंगनाला पंजाबमध्ये करावा लागला होता तीव्र विरोधाचा सामना
यापूर्वी कंगना रनोटला किरतपूर साहिबमध्ये शेतकऱ्यांनी घेरले होते. जिथे तिच्या वक्तव्याला विरोध झाला. शेतकऱ्यांनी तिच्या गाडीला घेराव घालून तिला माफी मागण्यास सांगितले होता. मात्र, शाहीन बाग आंदोलनासाठी तिने वक्तव्य केले होते, असे तिचे म्हणणे होते. कंगनाने शेतक-यांची माफी मागितल्याची चर्चा होती, मात्र कंगनाने याचा इन्कार केला होता. त्यावेळी कंगना हिमाचलहून पंजाबमार्गे चंदीगडला येत होती.

बातम्या आणखी आहेत...