आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतातील 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाला बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस या आहेत तर निर्मात्या गुनीत मोंगा आहेत. केवळ 39 मिनिटांच्या या लघुपटात मानव आणि प्राणी यांच्यातील नातं दाखवण्यात आलं आहे.
चित्रपटाची कथा दक्षिण भारतीय जोडपे बोमन आणि बेली यांची आहे, जे रघू नावाच्या अनाथ हत्तीची काळजी घेतात. ही डॉक्युमेंट्री मूळ तमिळ भाषेत तयार करण्यात आली होती. 8 डिसेंबर 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली.
5 वर्षांत शूट झाली फिल्म, एकूण 450 तासांचे फुटेज केले कॅप्चर
'द एलिफंट व्हिस्परर्स' हा लघुपट आहे. या श्रेणीतील चित्रपट बनवण्यासाठी वास्तव जीवनातील व्यक्तींना फॉलो केले जाते. चित्रपटाच्या दिग्दर्शिका कार्तिकी यांनी दोन माणसे आणि हत्तीच्या बाळाला 5 वर्षे फॉलो केले. हे दोन लोक होते बोमन आणि बेली.
त्यांनी बेबी एलिफंट रघूसोबत घालवलेले सर्व क्षण कैद केले. रघूचे शॉट कॅप्चर करण्यासाठी त्याला कोकोनट मिश्रण खायला देत होते. तो आनंदाने उड्या मारायचा आणि ते क्षण रेकॉर्ड केले जायचे. साडेचारशे तासांचे फुटेज कॅप्चर केले होते.
निसर्ग संवर्धनाचे महत्त्वही सांगितले
हा चित्रपट तामिळनाडूमधील मदुमलाई रिझर्व्हवर बेतलेला आहे. यात लोकेशनचे नैसर्गिक सौंदर्यदेखील दर्शवण्यात आले आहे. यासोबतच आदिवासींचे निसर्गाप्रति असलेले प्रेमही दिसून आले आहे. आदिवासींनी निसर्गाचे रक्षण कसे केले हे सांगितले आहे. भारतीय संस्कृती आणि पर्यावरण रक्षणाची परंपराही या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
रघूला आपला मुलगा मानतात बोमन-बेली, अशी मिळाली कहाणी...
'दैनिक भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक कार्तिकी म्हणाल्या होत्या- मी माझ्या रघुसोबतच्या मैत्रीच्या प्रवासाचे शूटिंग करत होते. फक्त डॉक्युमेंट्री बनवायची आहेत असे मनात नव्हते. पण टिपलेले ते मनमोहक क्षण बघून मला वाटले की 15 मिनिटांचा लघुपट बनवावा.
त्या म्हणाल्या होत्या की- काही फुटेज कॅमेऱ्यात शूट झाले, काही फोनमध्ये रेकॉर्ड झाले. बोमन, बेली आणि रघूची प्रत्येक गोष्ट मी कॅमेऱ्यात टिपत राहिले. मला तिघांमध्येही एक अद्भुत कौटुंबिक नाते दिसून आले. दोघेही रघूला आपला मुलगा मानत होते. या गोष्टींनी मला आश्चर्य वाटले की ही एक अद्भुत कथा आहे.
चित्रपटाचा नेटफ्लिक्सपर्यंत पोहोचण्याचा प्रवास...
निर्मात्या गुनीत मोंगा यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, दिग्दर्शक कार्तिकीला कथा सापडली. तिला बोमन, बेली आणि रघूबद्दल माहिती होती. चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी बेबी एलिफंट- रघुशी मैत्री केली. मैत्री व्हायला एक वर्ष लागले.
हत्तीचे बाळ खूप गोंडस असतात. मन दुखावण्यापासून ते आनंदापर्यंत, ते सर्व काही प्रमाणात माणसासारखे वागतात. कार्तिकीने सर्व काही शूट केले. त्याचा ट्रेलर बनवला. त्यांची व्हिज्युअल स्ट्रेंथ कमालीची आहे. त्यानंतर कार्तिकीने नेटफ्लिक्ससोबत ट्रेलर शेअर केला, जो नेटफ्लिक्सला खूप आवडला.
जंगलात गेले आहे दिग्दर्शकाचे अर्धे आयुष्य
'द एलिफंट व्हिस्परर्स'च्या दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विसने मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्यांचे अर्धे आयुष्य जंगलात गेले आहे. त्या म्हणाल्या होत्या की- वयाच्या 18 महिन्यांपासून माझं जंगलात येणं-जाणं आहे. माझे बालपण घोडेस्वारीत, नद्यांच्या काठावर गेले. माझी आईदेखील नैसर्गिक इतिहास आणि सांस्कृतिक फोटोग्राफीमध्ये राहिली आहे. माझी आजी नॅचरल रिझर्व्हमध्ये राहिली आहे आणि त्यांनी त्याबद्दल शिकवलेही आहे. त्यामुळे मला अगदी लहान वयात प्राण्यांच्या वर्तनाबद्दल बरीच माहिती मिळाली. अॅनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी चॅनलवरील शोसाठी मी कॅमेरावुमनदेखील राहिली आहे. माझा बहुतेक वेळ निर्जन ठिकाणी जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.