आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

95 वर्षांत फक्त 13 भारतीयांना मिळाले ऑस्करचे नामांकन:8 जिंकले, 'मदर इंडिया' चित्रपट फक्त एका मताने ऑस्करला मुकला

कविता राजपूत13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

95 व्या ऑस्कर सोहळ्यात भारताला प्रथमच दोन पुरस्कार मिळाले आहेत. RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजिनल साँगचा पुरस्कार मिळाला. तर द एलिफंट व्हिस्परर्स हा सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट ठरला. मात्र, ऑल दॅट ब्रीथ्स ही डॉक्युमेंटरी फीचर फिल्म या शर्यतीतून बाहेर पडली आहे. यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला या तीन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले.

95 वर्षांत भारतातून आतापर्यंत 50 वेळा ऑस्करसाठी चित्रपट पाठवण्यात आले. गांधी, स्लमडॉग मिलेनियर सारख्या चित्रपटांना ऑस्कर मिळाले पण हे भारतीय चित्रपट नव्हते. आतापर्यंत मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान हे चित्रपट आहेत जे ऑस्करसाठी अंतिम नामांकनापर्यंत पोहोचले आहेत. मात्र त्यांना पुरस्कार मिळाला नाही. ऑस्कर ज्युरीकडे चित्रपट नाकारण्याची स्वतःची कारणे आहेत, परंतु काही वेळा त्यांचे तर्क खूपच हास्यास्पद होते.

आतापर्यंत 13 भारतीयांना ऑस्करमध्ये नामांकने मिळाली आहेत, त्यापैकी फक्त 8 पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत, ज्यात भानू अथैय्या, सत्यजित रे, ए.आर. रहमान-गुलजार (पुरस्कार शेअर केला), रसुल पुकुट्टी, चंद्रबोस-एमएम किरवानी, गुनीत मोंगा यांचा समावेश आहे. गुनीत मोंगा यांनी कार्तिकी गोन्साल्विससह हा पुरस्कार शेअर केला.

नामांकन मिळालेल्या सर्व चित्रपट, माहितीपट किंवा लघुपटांवर एक नजर टाकूया...

1957: FFI (फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया) ने 29 व्या अकादमी पुरस्कारांसाठी मदर इंडिया हा चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीत पहिला अधिकृत प्रवेश पाठवला. मात्र 'नाइट ऑफ कॅबिरिया'कडून अवघ्या एका मताने या चित्रपटाचा पराभव झाला.

1957 मध्ये, 29 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये 'मदर इंडिया' केवळ एका मताने ऑस्करला मुकला.
1957 मध्ये, 29 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये 'मदर इंडिया' केवळ एका मताने ऑस्करला मुकला.

खरं तर, राधाची भूमिका साकारणाऱ्या नर्गिसने तिचा नवरा पळून गेल्यावर तिला सतत मदत करू इच्छिणाऱ्या लाला सुखिलालच्या लग्नाचा प्रस्ताव का फेटाळला याबद्दल ऑस्करच्या काही ज्युरी सदस्यांना प्रश्न पडला होता. राधाने लालाशी लग्न केले असते तर तिच्या मुलांना एवढा संघर्ष करावा लागला नसता. येथे नायिकेने पुराणमतवादी विचार दर्शविला.

1961: निर्माता ईस्माइल मर्चंट यांचा 13 मिनिटांचा लघुपट 'द क्रिएशन ऑफ वुमन' (1961) 33 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट शॉर्ट सब्जेक्ट (लाइव्ह अॅक्शन) श्रेणीमध्ये नामांकित झाला, परंतु जिंकू शकला नाही.

1969: फाली बिलिमोरियांचा लघुपट 'द हाऊस दॅट आनंदा बिल्ट' (1968) हा 41व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट (लघु विषय) साठी नामांकित झाला होता, परंतु पुरस्कार जिंकू शकला नाही.

1978: ईशू पटेल यांच्या शॉर्ट अ‍ॅनिमेटेड 'बीड गेम' (1977) ला 50 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म श्रेणीमध्ये नामांकन मिळाले, परंतु हा देखील ऑस्कर जिंकू शकला नाही.

1979: 18 मिनिटांचा माहितीपट An Encounter with Faces (1978) 51 व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल आणि सिनेमॅटोग्राफी श्रेणीमध्ये नॉमिनेट झाला होता. पण तो ऑस्कर जिंकू शकला नाही.

1983: भानू अथैय्या यांना मिळाला होता पहिला ऑस्कर
भानू अथैय्या 55 ​​व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट कॉश्च्युम डिझाइनसाठी ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या. 1982 मध्ये रिचर्ड एटनबर्ग यांच्या गांधींसाठी त्यांनी हा पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार त्यांनी जॉन मोलोसोबत शेअर केला होता.

गांधींसाठी, इंग्रजी संगीतकार जॉर्ज फेंटन यांच्यासह सतारवादक पंडित रविशंकर यांना नामांकन मिळाले होते. त्यांना बेस्ट ओरिजिनल स्कोअरसाठी हे नामांकन मिळाले पण ते अकादमी पुरस्कार जिंकू शकले नाहीत.

1987: निर्माता ईस्माइल मर्चंट यांना रोमँटिक चित्रपट 'ए रूम विथ अ व्ह्यू'साठी 59 व्या अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते, परंतु चित्रपटाला पुरस्कार मिळाला नाही.

1989: मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे (1988) 61 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत नामांकित झाला, परंतु पुरस्कार जिंकू शकला नाही. हा चित्रपट मुंबईतील झोपडपट्टीच्या परिस्थितीवर आधारित होता.

1992: सत्यजित रे यांना मिळाला ऑनरेरी लाफटाइम अचिव्हमेंट अकॅडमी अवॉ

ऑस्कर मिळाल्यानंतर एक महिन्यानंतर 23 एप्रिल 1992 रोजी सत्यजित रे यांचे निधन झाले.
ऑस्कर मिळाल्यानंतर एक महिन्यानंतर 23 एप्रिल 1992 रोजी सत्यजित रे यांचे निधन झाले.

बंगाली दिग्दर्शक सत्यजित रे यांना 1992 मध्ये 64 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ऑनरेरी लाफटाइम अचिव्हमेंट अकॅडमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.

त्यावेळी सत्यजित रे खूप आजारी असल्याने पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. पुरस्कार समितीने स्वत: भारतात येऊन रुग्णालयात दाखल असलेल्या रे यांना पुरस्कार प्रदान केला होता. प्रसिद्ध अभिनेत्री ऑड्रे हेपबर्न स्वतः पुरस्कार घेऊन समितीसोबत भारतात आल्या होत्या.

त्यावेळी त्या स्वतः 62 वर्षांची होती आणि एक वर्षानंतर 1993 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील 64 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातही रे यांच्या नावाची घोषणा ऑड्रे हेपबर्न यांनी मंचावरून केली होती. त्या म्हणाल्या होत्या, 'सत्यजित रे चार दशकांपासून चित्रपट बनवत आहेत. जगभरातील चित्रपट निर्मात्यांसमोर त्यांनी आपला आदर्श ठेवला आहे.'

पुरस्कार स्वीकारण्यासाठी सत्यजित रे अमेरिकेला जाऊ शकले नाहीत, पण कोलकात्याच्या रुग्णालयातून रेकॉर्ड केलेला त्यांचा व्हिडिओ या समारंभात दाखवण्यात आला. यामध्ये सत्यजित रे तपकिरी रंगाचा कुर्ता परिधान करून बेडवर झोपलेले दिसले.

ते म्हणाला होते, 'हा पुरस्कार स्वीकारणे आणि आज रात्री येथे तुमच्यासोबत असणे हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी आहे. मी लहान असताना, शाळेत असतानाही मला चित्रपटांमध्ये खूप रस होता. मी चित्रपटाचा चाहता होतो. मग मला चित्रपटांची आवड निर्माण झाली. चित्रपटसृष्टीबद्दल जे काही शिकलो ते अमेरिकन चित्रपटांमधूनच शिकलो. म्हणूनच आज मी मोशन पिक्चर अमेरिकन सिनेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांनी मला हा सन्मान दिला.'

1993: ईस्माइल मर्चंट यांना 1992 च्या 'हॉवर्ड्स एंड' चित्रपटासाठी तिसरे ऑस्कर नामांकन मिळाले. हॉवर्ड्स एंडला 65 व्या ऑस्करमध्ये बेस्ट पिक्चर श्रेणीमध्ये नामांकन मिळाले पण पुरस्कार प्राप्त होऊ शकला नाही.

1994: 66 व्या ऑस्करमध्ये ईस्माइल मर्चंट निर्मित 'द रिमेन्स ऑफ द डे' या चित्रपटाला बेस्ट पिक्चर श्रेणीत नामांकन मिळाले पण पुरस्कार मिळाला नाही.

2002: आशुतोष गोवारीकरांच्या 'लगान' (2002) ला देखील 2002 मध्ये बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी ऑस्कर नामांकन मिळाले. हा चित्रपट 224 मिनिटांचा होता. हेच त्याच्या पराभवाचे कारण ठरले. वेळेच्या कमतरतेमुळे ज्युरी संपूर्ण चित्रपट पाहू शकले नाहीत. नो मॅन्स लँड हा या वर्षीचा ऑस्कर जिंकणारा चित्रपट फक्त 98 मिनिटांचा होता.

2005 : 2004 मध्ये प्रदर्शित झालेला अश्विन कुमार यांच्या लिटल टेररिस्ट या चित्रपटाला 77 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट शॉर्ट सब्जेक्ट श्रेणीतील नामांकन मिळाले होते. पण हा चित्रपट पुरस्कार प्राप्त करु शकला नाही.

ए.आर. रहमान यांनी 2009 मध्ये स्लमडॉग मिलेनियरसाठी दोन ऑस्कर जिंकले.
ए.आर. रहमान यांनी 2009 मध्ये स्लमडॉग मिलेनियरसाठी दोन ऑस्कर जिंकले.

2009: ए.आर. रहमान यांनी दोन ऑस्कर जिंकले

ए.आर. रहमान यांना 2008 च्या स्लमडॉग मिलेनियर चित्रपटासाठी 81 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये दोन ऑस्कर मिळाले. हा पुरस्कार त्यांना बेस्ट ओरिजिनल स्कोअर आणि ओरिजिनल साँग कॅटेगरीत मिळाला होता.

2009: रेसल पुकुटी यांनी स्लमडॉग मिलेनियरसाठी ऑस्कर पटकावला

भारतीय साउंड डिझायनर रेसल पुकुटी यांनी याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंगसाठी ऑस्कर जिंकला.

2011: 83 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये 'इफ आय राइज' या चित्रपटासाठी बेस्ट ओरिजिनल स्कोअर आणि बेस्ट ओरिजिनल साँग श्रेणीत नामांकन मिळाले, परंतु त्यांना पुरस्कारावर मोहोर उमटवता आली नाही.

2013: बॉम्बे जयश्री रामनाथ यांना 'लाइफ ऑफ पाई' (2012) साठी 85 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट ओरिजिनल साँग श्रेणीत नामांकन मिळाले होते परंतु त्यांना पुरस्कार मिळाला नाही.

2022: चित्रपट निर्माते सुष्मित घोष आणि रिंटू थॉमस यांना 94 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट डॉक्युमेंटरी फीचरसाठी नामांकन मिळाले होते. परंतु त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही.

ऑस्कर सोहळ्यात आरआरआर चित्रपटातील नाटू-नाटू गाणे लिहिणारे चंद्रबोस आणि संगीतकार एमएम किरवानी यांनी पुरस्कार स्वीकारला.
ऑस्कर सोहळ्यात आरआरआर चित्रपटातील नाटू-नाटू गाणे लिहिणारे चंद्रबोस आणि संगीतकार एमएम किरवानी यांनी पुरस्कार स्वीकारला.

2023: 'RRR' चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याला 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. गीतकार चंद्रबोस आणि संगीतकार MM किरवानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यासह 'द एलिफंट व्हिस्परर्स' हा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी लघुपट ठरला. यासाठी दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस आणि निर्मात्या गुनीत मोंगा यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'ऑल दॅट ब्रीथ्स रेस' या डॉक्युमेंटरी फीचर फिल्मला नामांकन मिळाले होते पण तो पुरस्कार जिंकू शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...