आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातून सोमवारी सकाळीच एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय चित्रपट RRR मधील 'नाटू-नाटू' गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला. यापूर्वी या गाण्याला 'गोल्डन ग्लोब' पुरस्कार मिळाला होता. भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे भारतीय चित्रपट 'द एलिफंट व्हिस्परर्स'ने बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला आहे. कार्तिकी गोन्साल्विसने याचे दिग्दर्शन केले आहे. तर गुनीत मोंगा ने प्रोड्यूस केला होता. पुरस्कार स्विकारताना गुनीत म्हणाली की- 2 महिलांनी भारतासाठी हे करून दाखवले. हा पुरस्कार माझ्या देशासाठी समर्पित आहे.
ऑस्कर पुरस्कार प्राप्त झालेल्या गुनीत यांचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांच्या 'पिरियड एंड ऑफ सेंटन्स' या चित्रपटाला 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटात बोमन आणि बेली या दक्षिण भारतीय जोडप्याची कथा आहे. जे रघु नावाच्या अनाथ हत्तीची काळजी घेतात. मानव आणि प्राण्यांमधील नातं या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे.
62 वर्षात पहिल्यांदाच लाल ऐवजी शॅम्पेन रंगाचे कार्पेट
रेड कार्पेटचा ट्रेंड 62 वर्षांपूर्वी ऑस्करमध्ये सुरू झाला होता. यावेळी हा ट्रेंड बदलला आहे. यावेळी ऑस्कर सोहळ्यात स्टार्सनी शॅम्पेन कलरच्या कार्पेटवर एन्ट्री घेतली. याआधी काल-राहुलने RRR च्या नातू-नातू गाण्यावर लाईव्ह परफॉर्मन्स दिला होता. उपस्थितांनी उभे राहून जल्लोष केला. लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या या अवॉर्ड शोमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्स पोहोचले होते.
नाटू-नाटूच्या गाण्यावर थिरकले हॉलिवूड
ऑल दॅट ब्रीद्स हा भारतीय डॉक्युमेंटरी चित्रपट शर्यतीतून बाहेर पडली. सर्वांच्या नजरा लागून असलेल्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला देखील सर्वोत्कृष्ट मुळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. तर यापूर्वी RRR च्या नाटू-नाटू या गाण्यावर राहुलने लाईव्ह परफॉर्मन्स केला होता. कार्यक्रमाला सुरुवात होताच प्रेक्षकांनी उभे राहून जल्लोष केला.
लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या या अवॉर्ड शोमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्स पोहोचले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट आणि फॅशनेबल लूकमध्ये सजलेल्या या स्टार्सनी शॅम्पेन रंगीत कार्पेटवर एन्ट्री केली. यावेळी सोहळ्यात रेड कार्पेटला स्थान देण्यात आलेले नाही. दीपिका पदुकोण यावर्षी सादरकर्ता म्हणून या सोहळ्याचा एक भाग बनली आहे. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता लॉस एंजेलिसमध्ये हा सोहळा सुरू झाला.
समारंभात 16 श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले गेले, खालीलप्रमाणे पुरस्कार जाहीर झाले
क्रमांक | श्रेणी | |
1 | बेस्ट एनिमेटेड फीचर फिल्म | फिल्म पिनोच्चियो |
2 | सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता | के हुई क्वान |
3 | सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री | जेमी ली कर्टिस |
4 | बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्म | नवलनी |
5 | बेस्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट | एन आयरिश गुडबाय |
6 | बेस्ट सिनेमॅटोग्राफी | ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट |
7 | मेकअप आणि हेयरस्टाइलिंग | द व्हेल |
8 | कॉस्ट्यूम डिझाइन | ब्लॅक पॅंथर |
9 | बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म | ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट |
10 | बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म | द बॉय, द मोल, द फॉक्स एंड द हॉर्स |
11 | बेस्ट ओरिजिनल स्कोर | वोल्कर बर्टेलमैन |
12 | बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले | एवरीथिंग एवरीवन ऑल एट वन्स |
13 | सर्वोत्कृष्ट कलाकार | ब्रेंडन फ्रेजर |
14 | सर्वोत्कृष्ट अभिनेत्री | मिशेल योह |
15 | सर्वोत्कृष्ट चित्रपट | एवरीथिंग एवरीवन ऑल एट वन् |
अपडेट्स
जेमी ली कर्टिसची प्रतिक्रिया
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकल्यानंतर जेमी ली कर्टिसने सांगितले की, माझ्या आई-वडिलांनीही ऑस्कर जिंकले आहेत. आता माझ्याकडेही ऑस्कर आहे. तिने हा पुरस्कार तिच्या पतीला तसेच तिच्या संपूर्ण कुटुंबाला समर्पित केला.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची खास छायाचित्रे...
हे ही वाचा ......
1) ऑस्कर पुरस्कार सोहळा उद्या, भारताची 3 नामांकने:या पुरस्काराला ऑस्कर नाव कसे पडले हे आजही एक रहस्यच
ऑस्कर 2023 नॉमिनेशन्सची संपूर्ण यादी
बेस्ट पिक्चर (सर्वोत्कृष्ट चित्रपट)
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फॅबलमॅन्स, टार, वीमेन टॉकिंग, ट्रँगल ऑफ सॅडनेस
बेस्ट डायरेक्शन (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन)
मार्टिन मॅकडोना (द बँशीज ऑफ इनिशेरिन), डॅनियल क्वान आणि डॅनियल, शायनर्ट (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), स्टीवन स्पीलबर्ग (द फॅबलमॅन्स), टॉड फील्ड (टार), रबेन ओस्टलँड (ट्रँगल ऑफ सॅडनेस)
बेस्ट ॲक्ट्रेस इन अ लीडिंग रोल (मुख्य अभिनेत्री)
केट ब्लँचेट (टार), ॲना डे आर्म्स (ब्लॉन्ड), अँड्रिया राइजबोरो (टू लेजली), मिशेल विलियम्स (द फॅबलमॅन्स), मिशेल येओ (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)
बेस्ट ॲक्टर इन अ लीडिंग रोल (मुख्य अभिनेता)
ऑस्टिन बटलर (एल्विस), कॉलिन फेरेल (द बँशीज ऑफ इनिशेरिन), ब्रँडन फ्रेजर (द ह्वेल), पॉल मॅसकल (आफ्टरसन), बिल नाय (लिविंग)
बेस्ट विजुअल इफेक्ट्स
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बॅटमॅन, ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर, टॉप गन: मॅवरिक
बेस्ट सिनेमॅटोग्राफी
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, एल्विस, टार, अम्पायर ऑफ लाइट, बार्डे, फॉल्स क्रॉनिकल ऑफ ए हँडफुल ऑफ थ्रथ्स
बेस्ट फिल्म एडिटिंग
द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, टार, टॉप गन: मॅवरिक
बेस्ट ॲक्ट्रेस इन सपोर्टिंग रोल (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री)
एंजेला बेसेट (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर ), हॉन्ग चाउ (द ह्वेल), केरी कोंडोन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), जेमी ली कर्टिस (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), स्टेफनी सू (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)
बेस्ट कॉस्च्युम डिझाइन
रूथ कार्टर (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर ), मेरी जोफ्रेस (बेबीलॉन), कॅथरीन मार्टिन (एल्विस), जेनी बीवन (मिस हेरिस गोज टू पेरिस)
बेस्ट साऊंड
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बॅटमॅन, एल्विस, टॉप गन: मॅवरिक
बेस्ट ओरिजनल स्कोअर
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, बेबीलॉन, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फॅबलमॅन्स
बेस्ट ॲडाप्टेड स्क्रीनप्ले
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ग्लास अन्यन: अ नाइव्स आउट मिस्ट्री, लिविंग, टॉप गन: मॅवरिक, वीमेन टॉकिंग
बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले
द बँशीज ऑफ इनिशेरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वंस, द फॅबलमॅन्स, टार, ट्रँगल ऑफ सॅडनेस
बेस्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म
ॲन आयरिश गुडबाय, लवालू, ले प्युपिल्स, नाइट राइड, द रेड सूटकेस
बेस्ट ॲनिमेटिड शॉर्ट फिल्म
द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स, द फ्लाइंग सेलर, आइस मर्चेंट्स, माय इअर ऑफ डिक्स, ॲन ऑस्ट्रिच टोल्ड मी द वर्ल्ड इज फेक अँड आय थींक आय बिलिव इट
बेस्ट ॲक्टर इन सपोर्टिंग रोल (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता)
ब्रँडन ग्लीसन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), ब्रायन टीरी हेनरी (कॉजवे), जुड हर्श (द फॅबलमॅन्स), बॅरी कियोगन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), के ह्यू क्वान (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)
बेस्ट ओरिजनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं)
अप्लॉज (टेल इट लाइक अ वुमेन), होल्ड माय हँड (टॉप गन: मॅवरिक), लिफ्ट मी अप (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर), दिस इज अ लाइफ (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), नाटू नाटू (आरआरआर)
बेस्ट डाक्युमेंट्री फीचर फिल्म
ऑल दॅट ब्रीद्स, ऑल द ब्युटी अँड द ब्लडशेड, फायर ऑफ लव्ह, अ हाऊस मेड ऑफ स्प्लिंटर्स, नवल्नी
बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्म
द एलिफेंट व्हिस्परर्स, हॉलआउट, हाउ डू यू मेजर अ इअर, द मार्था मिचेल इफेक्ट, स्ट्रेंजर ॲट द गेट
बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अर्जेंटीना, 1985, क्लोज, ईयो, द क्वाइट गर्ल
बेस्ट ॲनिमेटिड फीचर फिल्म
गुइलेर्मो डेल टोरो का पिनोचियो, मार्सेल द शेल विद शूज ऑन, पुस इन बूट्स: द लास्ट विश, द सी बीस्ट, टर्निंग रेड
बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग
द बॅटमॅन, ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर, एल्विस, द ह्वेल
बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, बेबीलॉन, एल्विस, द फॅबलमॅन्स
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.