आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्कर विजेते अभिनेते क्रिस्टोफर प्लमर काळाच्या पडद्याआड:'साउंड ऑफ म्युझिक' चित्रपटातील अभिनेत्याचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन, पडल्याने डोक्याला लागला होता जबर मार

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या महान अभिनेत्याच्या निधनामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

हॉलिवूडचे दिग्गज ऑस्कर विजेते अभिनेते क्रिस्टोफर प्लमर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. याची पुष्टी त्यांचे जुने मित्र आणि व्यवस्थापक लू पिट यांनी शुक्रवारी केली. क्रिस्टोफर यांच्या 51 वर्षीय पत्नी एलेन टेलर यांनी सांगितल्यानुसार, पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता, त्यामुळे त्यांचे निधन झाले. या महान अभिनेत्याच्या निधनामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

दोन टोनी आणि दोन एमी पुरस्कार आपल्या नावी केले होते
क्रिस्टोफर प्लमर यांना द साउंड ऑफ म्युझिक या गाजलेल्या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखले जाते. कॅनेडियन वंशाच्या प्लमर यांनी त्यांच्या कारकीर्दीत ऑस्कर, दोन टोनी आणि दोन एमी पुरस्कार आपल्या नावी केले होतेे. ते रंगभूमीवर विलियम शेक्सपियरच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. 'साउंड ऑफ म्युझिक'व्यतिरिक्त प्लमर यांना सात दशकांच्या कारकीर्दीत 'ऑल द मनी इन द वर्ल्ड' आणि 'द लास्ट स्टेशन' यासारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी देखील ओळखले जाते.

2010 मध्ये 'बिगिनर्स'साठी मिळाला होता अकादमी पुरस्कार
प्लमर यांचा जन्म 13 डिसेंबर 1929 रोजी टोरांटो येथे झाला होता. त्यांनी आपली करिअरची सुरुवात फ्रेंच आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये स्टेज आणि रेडिओवरून केली होती. 1954 मध्ये न्यूयॉर्कच्या स्टेज डेब्यूनंतर त्यांनी ब्रॉडवे आणि लंडनच्या वेस्ट एंडमधील अनेक नामांकित प्रॉडक्शनमध्ये काम केले होते. प्लमर यांनी 'द स्टारक्रॉस स्टोरी'सह ब्रॉडवेमध्ये पदार्पण केले होते. न्यूयॉर्कच्या रंगभूमीवर त्यांनी यापूर्वीच आपली छाप पाडली होती. त्यांनी 'जे.बी.', 'द टोनी' आणि 'बुक ऑफ जॉब' या नाटकांत अभिनय केला होता. प्लमर यांनी 2010 मध्ये आलेल्या 'बिगिनर्स' या चित्रपटातील भूमिकेसाठी अकादमी पुरस्कार मिळाला होता. वयाच्या 82 व्या वर्षी हा पुरस्कार जिंकणारे ते सर्वात वयस्क व्यक्ती ठरले होते. त्यांना 'ऑल मनी इन द वर्ल्ड' साठी ऑस्करचे नामांकन मिळाले होते.

'स्टेज स्ट्रक'सारख्या बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले
दिग्दर्शक सिडनी लुमेट यांनी 'स्टेज स्ट्रक' (1958) चित्रपटातून प्लमर यांना मोठ्या पडद्यावर आणले होते. यानंतर ते 'फॉल ऑफ द रोमन एम्पायर' (1964), 'बॅटल ऑफ ब्रिटन' (1969), 'वाटरलू' (1970), 'द मॅन हू बीन किंग' (1975), 'स्टार ट्रेक VI' (1991) आणि 'ट्वेल्व मंकीड' (1995) सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये झळकले. तसेच प्लमर रॉयल नॅशनल थिएटर आणि रॉयल शेक्सपियर कंपनीचे माजी प्रमुख सदस्य होते. तिने त्यांनी लंडन इव्हनिंग स्टँडर्ड थिएटर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला होता.