आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते रॉबर्ट डी नीरो हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. वयाच्या 79 वर्षीय ते वडील झाले आहेत. रॉबर्ट यांनी त्यांचा आगामी चित्रपट 'अबाउट माय फादर'च्या प्रमोशनदरम्यान त्यांच्या सातव्या अपत्याच्या जन्म झाल्याचा खुलासा केला आहे.
काय म्हणाले रॉबर्ट डी नीरो?
रॉबर्ट डी नीरो हे ऑस्कर विजेते अभिनेते असून त्यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये पालकत्वाबद्दल बोलताना रॉबर्ट डी नीरो म्हणाले, 'मला मुलांना नियम सांगायला आवडत नाही, परंतु त्यांना नियम सांगावे लागतात, दुसरा कोणताही मार्ग नाही. कोणतेही पालक असेच म्हणतील असे मला वाटते प्रत्येकाला नेहमीच मुलांना योग्य मार्गावर न्यायचे असते, त्यांनी योग्य ते करावे असे वाटते.'
जेव्हा रॉबर्ट डी नीरो यांना त्यांच्या सहा मुलांबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, 'सहा नाही सात मुले आहेत. तुम्ही सातव्या मुलाबद्दल विचारू शकता, मला नुकतेच एक मूल झाले आहे,' असे ते म्हणाले. रॉबर्ट डी निरो यांच्या या सातव्या मुलाची आई टिफनी चेन असू शकते असे म्हटले जात आहे. मध्यंतरी एका डिनर डेटदरम्यान तिने तिच्या बेबी बम्पचे फोटोज शेअर केले होते.
रॉबर्ट डी नीरो यांना यापूर्वी सहा मुले झाली आहेत. पहिली पत्नी डायना अॅबॉटपासून त्यांना मुलगी ड्रेना आणि मुलगा राफेल आहे. 1995 मध्ये रॉबर्ट यांची गर्लफ्रेंड टोकी स्मिथने ज्युलियन आणि हारुन या जुळ्या मुलांना जन्म दिला. तर रॉबर्ट यांना दुसरी पत्नी ग्रेसपासून इलियट आणि हेलन ही मुले आहेत. आता रॉबर्ट डी नीरोच्या घरी सातव्यांदा नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यांचा थोरला मुलगा आता 46 वर्षांचा आहे.
दोनदा ऑस्कर पुरस्कारावर कोरले नाव
रॉबर्ट डी निरो यांनी 'द गॉडफादर: पार्ट 2' या चित्रपटासाठी 1975 मध्ये आणि 'रॅगिंग बुल' या चित्रपटासाठी 1981 मध्ये ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी 'द आयरिशमॅन', 'द गॉडफादर: पार्ट 2', 'रेजिंग बुल' आणि 'टॅक्सी ड्राइव्हर' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ते लवकरच 'अबाउट माय फादर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.