आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्कर अवॉर्ड्स:प्रियांका चोप्रा स्टारर 'द व्हाइट टाइगर'च्या पदरी अपयश, 'नोमडलँड' चित्रपटाने 3 श्रेणीत पटकावले पुरस्कार आणि 73 वर्षीय यूह-जुंह यूनने रचला इतिहास

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटर येथे पुरस्कारांची घोषणा झाली.

93 वा अकॅडमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या पदरी निराशा आली आहे. तिची महत्त्वाची भूमिका असलेला द व्हाइट टायगर या चित्रपटाला बेस्ट अडॉप्टेड स्क्रीनप्ले कॅटेगरीत नामांकन मिळाले होते. मात्र या कॅटेगरीत द फादर या चित्रपटाने बाजी मारली. हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटर येथे पुरस्कारांची घोषणा झाली.

या पुरस्कार सोहळ्यात ‘नोमडलँड’ चित्रपटाने आपली मोहोर उमटवली आहे. चित्रपटाने तीन पुरस्कारांवर आपले नाव कोरत यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात बाजी मारली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (फ्रान्सिस मॅकडॉर्मंड) आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (क्लोए झाओ) हे पुरस्कारदेखील आपल्या नावी केले आहेत. ऑस्करच्या इतिहासात दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळालेल्या त्या दुसऱ्या महिला दिग्दर्शक ठरल्या आहेत. या आधी बाफ्टा पुरस्कार सोहळ्यातही ‘नोमडलँड’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यासोबतच गोल्डन ग्लोब, डिजीए या पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला विविध श्रेणीत पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

  • अँथनी ठरले सर्वात वयस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेते

93 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 83 वर्षीय अँथनी हॉपकिन्स यांना 'द फादर' या चित्रपटासाठी मिळाला आहे. या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावणारे ते सर्वात वयस्कर अभिनेते ठरले आहेत. यापूर्वी 2011 मध्ये क्रिस्तोफर प्लमर यांनी वयाच्या 82 व्या वर्षी 'बिगिनर्स' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

अँथनी हॉपकिन्स यांना दुस-यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी त्यांना 1991 मध्ये 'द सायन्स ऑफ द लॅम्ब्स' चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला होता.
अँथनी हॉपकिन्स यांना दुस-यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी त्यांना 1991 मध्ये 'द सायन्स ऑफ द लॅम्ब्स' चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला होता.
  • 73 वर्षीय यूह-जुंग यूना यांनी रचला इतिहास

73 वर्षीय दक्षिण कोरियन अभिनेत्री यूह-जुंग यूनने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. हा पुरस्कार जिंकणा-या त्या दक्षिण कोरियाच्या पहिल्या अभिनेत्री आणि आशिया खंडातील दुस-या अभिनेत्री ठरल्या आहेत. आशियात पहिला सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार 1958 मध्ये 'सायोनारा' या चित्रपटासाठी जपानी-अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मियोशी उमेकी यांना मिळाला होता.

60 च्या दशकापासून टीव्ही आणि 70 च्या दशकापासून चित्रपटांमध्ये काम करत असलेल्या यूह-जुंह यून यांना कारकीर्दीमधील पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
60 च्या दशकापासून टीव्ही आणि 70 च्या दशकापासून चित्रपटांमध्ये काम करत असलेल्या यूह-जुंह यून यांना कारकीर्दीमधील पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
  • भारतीय वंशाच्या सावन कोटेचा यांच्या पदरी पडली निराशा

भारतीय-अमेरिकन संगीतकार सावन कोटेचा यांना 'यूरोविजन साँग कॉन्टेस्टः द स्टोरी ऑफ फायर सागा' चित्रपटातील 'हुसाविक' या गाण्यासाठी ओरिजिनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळाले होते. परंतु या कॅटेगरीत 'जुडास अँड द ब्लॅक मसीहा' चित्रपटातील 'फाइट फॉर यू' या गाण्याने बाजी मारली.

  • विजेत्यांची यादी
कॅटेगरीविजेताफिल्म
बेस्ट अ‍ॅक्टर (लीडिंग रोल)अँथनी हॉपकिन्सद फादर
बेस्ट अ‍ॅक्ट्रेस (लीडिंग रोल)फ्रांसिस मैकडोर्मंडनोमडलँड
बेस्ट पिक्चरनोमडलँड
बेस्ट ओरिजिनल साँगफाइट फॉर यू (एच ई आर डेरन एमिल आणि टिआरा थोमस)जुडास अँड द ब्लॅक मसीह
बेस्ट ओरिजिनल स्कोरट्रेंट रेजनो, एटिकस रोज आणि जॉन बतिस्तेसोल
जीन हरशॉल्ट ह्यूमनिटेरियन अवॉर्डटेलर पॅरी
बेस्ट फिल्म एडिटिंगमिक्केल ई जी निएल्सनसाउंड ऑफ मेटल
बेस्ट सिनेमॅटोग्राफीErik Messerschmidtमांक
बेस्ट प्रॉडक्शन डिझाइनबर्ट (प्रॉडक्शन डिझाइन), जॅन पास्केले (सेट डिझाइन)मांक
बेस्ट अ‍ॅक्ट्रेस सपोर्टिंग रोलयूह-जुंग यूनमिनारी
बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्सएंड्रू जॅक्सन, डेविड ली, एंड्रू लॉकले आणि स्कॉट फिशरटेनेंट
बेस्ट डॉक्युमेंट्री (फीचर)माय ऑक्टोपस टीचर
बेस्ट डॉक्युमेंट्री (शॉर्ट सब्जेक्ट)कोलेट
बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्मसोल
बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्मइफ एनिथिंग हॅपन्स आई लव यू
बेस्ट लाइव अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्मटू डिस्टेंट स्ट्रेंजर्स
बेस्ट साउंडसाउंड ऑफ मेटल
बेस्ट डायरेक्शनक्लोए झाओनोमडलँड
जीन हरशॉल्ट ह्यूमनिटेरियन अवॉर्डद मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन फंड
बेस्ट कॉस्टयूम डिझाइनएन रोथमा रॅनिज ब्लॅक बॉटम
बेस्ट मेकअप अँड हेअर स्टाइलमिया नील, सेर्गियो लोपेज, रिवेरा, जॅमिका विल्सनमा रॅनीज ब्लॅक बॉटम
बेस्ट अ‍ॅक्टर सपोर्टिंग रोलडॅनियल कलूया
बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्मएनादर राउंड
बेस्ट अडॉप्टेड स्क्रीनप्लेफ्लोरियन जेलर, क्रिस्टोफर हॅम्पटनद फादर
बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्लेएमरेल्ड फेनेलप्रोमिसिंग यंग वीमेन
  • कोरोना दरम्यान नो मास्क पॉलिसी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑस्कर सेरेमनी सोहळा भव्य रुपात पार पडला नाही. 225 देशांमध्ये या सोहळ्याचे प्रसारण झाले. नो मास्क पॉलिसीनुसार सोहळा पार पडला. कॅमेरा सुरु असताना किंवा कॅमे-यासमोर असताना कलाकारांना मास्क काढण्याची परवानगी होती. यानंतर त्यांना फेस मास्क घालणे आवश्यक होते.

  • या चित्रपटांना मिळाले पाचहून अधिक नामांकने

नॉमिनेशन सेरेमनीत 'मांक' या चित्रपटाला 10, 'द फादर'ला 6, 'जुडास अँड द ब्लॅक मसीहा'ला 6, 'मिनारी'ला 6, 'नोमडलँड'ला 6, 'साऊंड ऑफ मेट'ला 6, 'द ट्रायल ऑफ द शिकागो'ला 6, 'मा रॅनिज ब्लॅक बॉटम'ला 5, 'प्रॉमिसिंग यंग वीमन'ला 5 नामांकने मिळाली होती. नॉमिनेशन सेरेमनीमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली होती. मुख्य कार्यक्रमामध्ये मात्र यावेळी कुणीही होस्ट नव्हता.

बातम्या आणखी आहेत...