आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवारी लॉस एंजेलिस येथे 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदा भारतासाठी हा सोहळा अतिशय खास ठरला. भारताला दोन पुरस्कार मिळाले आहेत. RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला. तर 'द एलिफंट व्हिस्परर्स' हा सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट ठरला.
2023 मध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटांची संपूर्ण यादी येथे पहा...
1. सर्वोत्कृष्ट चित्रपट : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' हा चित्रपट
रिलीज डेट : 16 सप्टेंबर 2022
दिग्दर्शक: डॅनियल क्वान आणि डॅनियल शिएनर्ट. त्यांना डॅनियल्स म्हणूनही ओळखले जाते.
चित्रपटाचा जॉनर : साय-फाय/अॅडव्हेंचर
येथे पाहा चित्रपट : सोनी LIV
हा चित्रपट चिनी-अमेरिकन स्थलांतरित एव्हलिन वांगची कथा आहे. दोन वर्षांपूर्वी एव्हलिन वांग पती आणि मुलीसह अमेरिकेत पळून गेली. आयआरएस अधिकारी एव्हलिनच्या अमेरिकेतील लॉन्ड्री व्यवसायाचे ऑडिट करतो. एव्हलिन तिचे तुटलेले लग्न, ऑडिट आणि तिच्या मुलीचे समलिंगी संबंध हाताळण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नादरम्यान, तिला हे कळते की विश्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी तिच्यावरच आहे.
2008 मध्ये, दिग्दर्शक डॅनी बॉयल यांच्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाने 9 ऑस्कर जिंकले होता.
2. सर्वोत्कृष्ट अभिनेता: 'द व्हेल' चित्रपटासाठी अभिनेता ब्रेंडन फ्रेझर
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल: 'द व्हेल' या चित्रपटासाठी जुडी चिन, अॅड्रियन मोरोट
रिलीज डेट : 3 फेब्रुवारी 2020
दिग्दर्शक: डॅरेन आरनोफ्स्की
चित्रपटाचा जॉनर : ड्रामा
येथे पाहा चित्रपट : अमेझॉन प्राइम, अॅप्पल टीव्ही, वुडू
या चित्रपटात चार्ली (ब्रेंडन फ्रेझर) एका इंग्रजी शिक्षकाच्या भूमिकेत आहे जो त्याच्या लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. चार्लीला हृदयविकार आहे. चार्लीला त्याच्या मुलीसोबत पुन्हा भेटायचे आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा चार्ली आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरते. आजारी असलेल्या चार्लीला कुटुंबाला का भेटायचं आहे, त्याला कशाची खंत आहे, चार्ली त्याच्या कुटुंबाला कधी आणि कसा भेटतो, हा चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे.
3. बेस्ट राइटिंग एडाप्टेड स्क्रीनप्ले : ‘वीमेन टॉकिंग’ चित्रपटासाठी सारह पॉली
रिलीज डेट : 23 डिसेंबर 2022
दिग्दर्शक : सारह पोली
चित्रपटाचा जॉनर : ड्रामा
येथे पाहा चित्रपट : नेटफ्लिक्स, हॉटस्टार, वूट, जिओ सिनेमा
धार्मिक वसाहतीतील महिलांचा एक गट कॉलनीतील पुरुषांबद्दल एक रहस्य उघड करतो. वर्षानुवर्षे वसाहतीत राहणाऱ्या महिलांना अंमली पदार्थ देऊन त्यांचे शोषण केले जात आहे. सत्य बाहेर आल्यानंतर महिला परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात.
4. सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म: 'पिन्नोचियो'
रिलीज डेट : 9 डिसेंबर 2022
दिग्दर्शक : गुईलर्मो डेल टोरो
चित्रपटाचा जॉनर : फँटसी
येथे पाहा चित्रपट : नेटफ्लिक्स
अचानक एके दिवशी इटलीमध्ये एका वडिलांची इच्छा पूर्ण होते. लाकडी रचना जिवंत होते. हे दोघे इटलीमध्ये आपले आयुष्य कसे घालवतात यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.
5. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म: 'ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट'
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: 'ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट'साठी क्रिश्चियन गोल्डबॅच आणि हिपर
सर्वोत्कृष्ट संगीत (ओरिजिनल स्कोर): 'ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट'साठी वोल्कर बेल्टरमेन
रिलीज डेट : 29 सप्टेंबर 2022
दिग्दर्शक: एडवर्ड बर्गेर
येथे पाहा चित्रपट : नेटफ्लिक्स
चित्रपटात 1914 मध्ये जर्मनीत युद्ध सुरू आहे. त्यामुळे तरुण विद्यार्थीही सैन्यात भरती होत आहेत. सैन्यात भरती झाल्यावर लोकांना युद्धाच्या वास्तवाची कल्पना येते.
6. सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म: नेवलनी
रिलीज डेट : 11 एप्रिल 2022
दिग्दर्शक: डॅनियल रोहर
येथे पाहा चित्रपट : नेटफ्लिक्स
हा चित्रपट रशियन नेता आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार नेवलनी यांच्या हत्येच्या प्रयत्नावर आधारित आहे. नर्व्ह एजंटच्या मदतीने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो.
7. बेस्ट साउंड : 'टॉप गन : मेवरिक'साठी मार्क वेंगार्टन, अल नेल्सन, क्रिस बर्डन
रिलीज डेट : 27 मे 2022
दिग्दर्शक: जोसेफ कोनिन्सकी
येथे पाहा चित्रपट : अमेझॉन प्राइम
8. सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स: 'अवतार : द वे ऑफ वॉटर'
रिलीज डेट : 16 डिसेंबर 2022
दिग्दर्शक: जेम्स कॅमेरून
हा एक एपिक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. यामध्ये पांडोरा आणि मानव यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे.
9. सर्वोत्कृष्ट संगीत मूळ गाणे: नाटू नाटू, संगीतकार - एमएम किरवानी, चंद्र बोस - चित्रपट : आर.आर.आर.
रिलीज डेट : 24 मार्च 2022
दिग्दर्शक: एसएस राजामौली
येथे पाहा चित्रपट : नेटफ्लिक्स
आदिवासी लोक आणि ब्रिटिश राज यांच्यातील संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. आदिवासी नेता ब्रिटीश सैन्यात सामील होतो आणि ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढतो.
10. सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइन: ब्लॅक पँथर, वकांडा फॉरएव्हरसाठी रुथ ई कार्टर
रिलीज डेट : 14 फेब्रुवारी 2018
दिग्दर्शक: रायन कूगलर
येथे पाहा चित्रपट : हॉटस्टार
11. सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : 'अॅन आयरिश गुडबाय'
रिलीज : 2020
दिग्दर्शक: रॉस व्हाइट, टेम बर्कली
येथे पाहा : नेटफ्लिक्स
दोन विभक्त झालेली भावंड आपापली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी जेव्हा ते भेटतात तेव्हा एका भावाला स्वतःच्या जमिनीवर शेती करायची असते, तर दुसऱ्याला कुटुंबासोबत राहायचे असते.
12. सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट: द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स
रिलीज डेट : 24 डिसेंबर 2022
दिग्दर्शक : चार्ली मॅकसी
येथे पाहा : नेटफ्लिक्स, अॅप्पल टीव्ही
चित्रपटाची कथा चार्ली मॅकसी यांच्या द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स या पुस्तकावर आधारित आहे.
13. सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट: द एलिफंट व्हिस्परर्स
रिलीज डेट : 8 डिसेंबर 2022
दिग्दर्शक: कार्तिकी गोन्साल्विस
येथे पहा: नेटफ्लिक्स
बोमन आणि बेली दक्षिण भारतात राहतात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एका हत्तीच्या बाळाला वाढवण्यात घालवले आहे आणि ते एका कुटुंबासारखे जगत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.