आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचित्रपटसृष्टीत सर्वोच्च मानाचा समजला जाणारा 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या वर्षी कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. या चित्रपटाने एक दोन नव्हे तर तब्बल सात पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.
'ऑस्कर 2023'मध्ये 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटाला वेगवेगळ्या 11 श्रेणीमध्ये नामांकने मिळाली होती. त्यापैकी या चित्रपटाने सात पुरस्कार पटकावले आहेत. पण तरीदेखील हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकलेला नाही. जाणून घ्या कोणकोणत्या श्रेणीत या चित्रपटाने पटकावला ऑस्कर
'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटाने 'ऑस्कर 2023' मध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत. के. हुई क्वानने 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला.
'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटातील जेमी ली कर्टिस हिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर 2023 पटकावला आहे. पुरस्कार सोहळ्यात तिने एंजेला बॅसेट (ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरेव्हर), हाँग चाऊ (द व्हेल), केरी कॉन्डोन (द बॅन्शीज ऑफ इनिशरीन) यांना मागे टाकले.
डॅनियल क्वान आणि डॅनियल शिइनर्ट यांना 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटासाठी मूळ पटकथेसाठी सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीचा किताब मिशेल योहने आपल्या नावी केला. 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'साठी तिला हा सन्मान मिळाला आहे.
नील क्वान आणि डॅनियल शिइनर्ट यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार 2023 देखील 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'ला मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट एडिटिंगचा ऑस्करही 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'ला मिळाला आहे. यासाठी पॉल रॉजर्स यांना सन्मानित करण्यात आले आहे.
'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'चे काय आहे कथानक ?
'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' हा चित्रपट एका चिनी महिलेच्या आयुष्यावर आधारित आहे. अनपेक्षित साहसाचा सामना केल्यानंतर महिलेला एका दुसऱ्याच विश्वात जावे लागते. त्या महिलेल्या अवती-भोवती फिरणारे चित्रपटाचे कथानक आहे.
तुम्ही कुठे पाहू शकता हा चित्रपट?
'ऑस्कर 2023'मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' हा चित्रपट सिनेरसिक प्राईम व्हिडिओवर पाहू शकतात. नील क्वान आणि डॅनियल शिइनर्ट यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.