आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेब सीरिजमध्ये चित्रपटांचे सुपरस्टार्स:OTT कडे स्वतःचे स्टार्स आहेत, पण आता सबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी इंडस्ट्रीच्या सुपरस्टार्ससोबत करत आहेत मोठी डील

हिरेन अंतानीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'फॅमिली मॅन 2' नंतर मनोज बाजपेयीला येत आहे 20 कोटींची ऑफर
  • 10 वर्षानंतरचा विचार करणारा ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या नफ्याच्या मूडमध्ये नाही

भारतात आता ओटीटीचा पुढील स्तरावरचा खेळ सुरू होत आहे. या मोठ्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार्सना ते मागतील तेवढे पैसे दिले जात आहेत. अजय देवगणला वेब सीरिजसाठी 125 कोटींची ऑफर असल्याची चर्चा आहे. यापूर्वी अक्षय कुमारलाही 90 कोटींची ऑफर मिळाली आहे.

दुसरीकडे, फॅमिली मॅन 2 नंतर मनोज बाजपेयीसारख्या स्टारला 20-22 कोटींची ऑफर येत असल्याची बातमी आहे. असा अंदाज वर्तविला जात आहे की, ओटीटीला आता चांगले काम करणा-या कलाकारांसोबतच बॉलिवूड स्टार्सचीही गरज भासू लागली आहे.

या सर्व घटनाक्रमाच्या मागे एक तर्क हा देखील आहे की, ओटीटीमध्ये बॉलिवूडसारखी स्टार सिस्टम सुरू होईल, परंतु काही विश्लेषकांचे मत आहे की, ओटीटी बॉलिवूडच्या तुलनेत डिस्ट्रीब्युशन चॅनल, प्रोजेक्ट मंजुरी आणि पेमेंट सिस्टमच्या बाबतीत खूप वेगळा आहे. म्हणून स्टार सिस्टम येथे वर्चस्व गाजवू शकत नाही.

दरनिहाय धोरण

  • देशातील ओटीटीचे पेड सब्सक्राइबर्स 3 ते 5 कोटींच्या दरम्यान आहेत. आयपीएलसारख्या क्रीडा स्पर्धेदरम्यान ही संख्या वाढते. या कारणास्तव डिस्ने हॉटस्टार सर्वात आघाडीवर आहे.
  • खरी लढाई जनरल एंटरटेन्मेंटमध्ये होईल. यासाठी एक महत्त्वाचे धोरण म्हणजे सबस्क्रिप्शन रेट. नेटफ्लिक्सने सिंगल स्क्रीनवर महिन्याच्या 199 रुपयांच्या प्लानने धमाका केला.
  • दुसरीकडे अ‍मेझॉन प्राइम आणि आता थोड्याफार प्रमाणात हॉटस्टार मोबाईल कंपन्यांसमवेत बंडल पॅकेज फॉर्मुला वापरुन त्यांच्या व्युअरशिपची संख्या वाढवित आहे.

कंटेंटनुसार स्ट्रॅटेजी
कंटेंटनुसार स्ट्रॅटेजी म्हणजे आपल्या मूळ शो आणि चित्रपटांचा विस्तार करणे. दुसरी मोठी रणनीती म्हणजे बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सनाही गुंतवून ठेवणे. हे सुपरस्टार्स कमी कालावधीत अधिक सब्सक्राइबर मिळवून देऊ शकतात.

टीव्हीमध्ये जे घडले, आता ओटीटीमध्ये त्याची पुनरावृत्ती होईल
केबीसीच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी सोनी टीव्हीसाठीचा संपूर्ण खेळच बदलला. सलमान 'बिग बॉस' घेऊन आणला आणि आमिरने 'सत्यमेव जयते' हा कार्यक्रम केला. आता ओटीटीमध्येही स्टार पॉवरचा खेळ सुरू होणार आहे. अजय देवगण हॉटस्टारच्या 'रुद्र' वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. अक्षय कुमारचा 'दी एंड' अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे.

OTT मध्ये आता आता मोठ्या स्टार्सना मिळत आहेत 3 ते 7 कोटी रुपये
10 भागांसाठी ओटीटीच्या कलाकारांना 1 ते 3 कोटी आणि मोठ्या स्टार्सना 3 ते 7 कोटी मिळतात. हे निर्माता, प्लॅटफॉर्म आणि स्क्रीन वेळेनुसार भिन्न असू शकते.

मनोज बाजपेयीची मागणी वाढली
मनोज बाजपेयीने यापूर्वीच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी मोहोर उमटवली आहे. मात्र 'फॅमिली मॅन'मुळे त्याला यशाची वेगळी चव चाखायला मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता संपूर्ण सीझनसाठी मनोजला 20 कोटींची ऑफर मिळत आहे.

फक्त पैसाच नाही तर नव्या ओळखीसाठी OTT कडे वळले बॉलिवूडचे हे चेहरे

सध्या शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, जूही चावला, आयशा जुल्का, सोनाक्षी सिन्हा आणि रवीना टंडन यांच्या वेब सीरिजही येणार आहेत. याशिवाय अनिल कपूरने 24 सारखी टीव्ही मालिकाही केली आहे. प्रियांका चोप्राचा 'क्वांटिको' देखील लोकप्रिय आहे.

सुपरस्टार्समुळे वेगाने वाढतील सब्सक्राइबर
व्यापार विश्लेषक गिरीश वानखेडे म्हणाले की, संजीव कुमार सर्वोत्कृष्ट अभिनेते होते, पण अमिताभ आपल्या काळातील सुपरस्टार होते. लोक संजीव कुमारचे कौतुक करत असत पण बॉक्स ऑफिसवर अमिताभच वर्चस्व गाजवत असे. त्याचप्रमाणे, आता ओटीटीकडे पंकज त्रिपाठी आणि प्रतीक गांधी यांच्यासारखे कलाकार आहेत, पण आता ओटीटीला ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या सुपरस्टार्सची आवश्यकता आहे.

सुपरस्टार्स नो रिस्क फॉर्मुला निवडतात
चित्रपटाप्रमाणे ओटीटीमध्येही सुपरस्टार नो रिस्क फॉर्मुला निवडतात. उदाहरणार्थ अजय देवगणचा 'रुद्र' हा यूकेच्या 'ल्यूथर' चा ऑफिशियल रीमेक आहे. इदरिस एल्बाने ल्यूथरमध्ये जे पात्र साकारले होते, ती भूमिका अजय साकारणार आहे. ही सीरिज इतकी सुपरहिट आहे की युकेमध्ये याचे पाच सीझन आले आहेत. म्हणजे हिट कंटेंटची पुनरावृत्ती होत आहे.

निधीची कमतरता नाही

नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टारकडे पैशांची कमतरता नाही. नेटफ्लिक्स एका महिन्यात किमान 200 कोटींचे टायटल रिलीज करते. त्याच्यासाठी भारतातील कोणत्याही सुपरस्टारला 100-125 कोटी देणे ही मोठी गोष्ट नाही.

भारतात आता कुठे सुरुवात झाली आहे
व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष आणि इमर्जिंग मीडिया हेड चैतन्य चिंचलीकर यांच्या म्हणण्यानुसार, जगभरातील मोठमोठे फिल्म स्टार्स आता ओटीटीसाठी काम करत आहेत. भारतात हाच ग्लोबल ट्रेंड फॉलो केला जातोय. मोठ्या कलाकारांव्यतिरिक्त अन्य कलाकारांनाही समान काम मिळत आहे.

एक किंवा दोन प्रोजेक्टमुळे ट्रेंड बनत नाही

सीनिअर ओटीटी प्रोफेशनल अपर्णा आचरेकर यांच्या मते, एक किंवा दोन प्रोजेक्ट्समधून एका नवीन ट्रेंडचा अंदाज अनेकदा अचूक नसतो. अजय देवगणला साइन करणे मार्केटिंगसोबतच क्रिएटिव्ह कॉलदेखील असू शकतो. कारण 'ल्यूथर' सारख्या सीरिजचा रिमेक त्याच उंचीचा बनवावा लागेल. त्यासाठी स्टारदेखील तेवढ्याच दमाचा लागतो.

125 कोटीचे पॅकेज असू शकते
जर आपण असे गृहीत धरले की, संपूर्ण पाच सीझनचा रिमेक असेल, तर 50 भाग तयार केले जातील. तसेच, जाहिराती आणि इतर गोष्टी देखील असतील. म्हणजेच 125 कोटी रुपयांची डिल संपूर्ण पॅकेज असू शकतो. अजय देवगनचे हॉटस्टारशी खूप चांगले संबंध आहेत. त्याचा 'भुज' हा चित्रपटही हॉटस्टारवर येत आहे. म्हणजे, या करारात इतरही अनेक बाबी असू शकतात.

काय बघितले जाईल की नाही, हे कुणीही सांगू शकत नाही
'सेक्रेड गेम्स' ही पहिली वेब सीरिजसाठी सैफसाठी चांगली ठरली, परंतु नंतर त्याचे दुसरे सीझन आणि 'तांडव'मध्ये तो फारशी कमाल दाखवू शकला नाही. दुसरीकडे, पंकज त्रिपाठीसाठी 'मिर्जापूर', मनोज बाजपेयीसाठी 'फॅमिली मॅन' आणि प्रितीक गांधीसाठी 'स्कॅम' क्लिक झाले. या तिन्ही कलाकारांनी यापूर्वी आपापल्या क्षेत्रात काम केले होते.

जनरलाइजेशन शक्य नाही

अपर्णा सांगतात, ओटीटीमध्ये लीड कास्टिंग केली जाते. किती एपिसोड्स आहेत, किती दिवसांचे काम आहे, आउटडोअर आहे किंवा नाही, को-स्टार कोण आहेत, निर्माता कोण आहे, कोणते प्लॅटफॉर्म आहे? या सर्व गोष्टी कास्टिंग आणि दरावर परिणाम करतात. टेक्निकल क्रूसाठी निश्चित दर असू शकतो, पण क्रिएटिव्हमध्ये नाही.​​​​​​

ओटीटी भारतीय नव्हे, ग्लोबल प्लॅटफॉर्म
सुपरस्टार्सच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणे हे काही प्रमाणात सत्य आहे, परंतु नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टारसारखे प्लॅटफॉर्म केवळ भारतच नव्हे तर जागतिक स्तरावरील प्लॅटफॉर्म आहेत. बिग बजेट आणि बड्या स्टार्समागे ग्लोबल ऑडिअन्सचा विचार केला जातो.

बातम्या आणखी आहेत...