आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एंटरटेन्मेंटसाठी कसे असेल 2021 हे वर्ष:OTT प्लॅटफॉर्म वाढतील; पण घरात बसून चित्रपट पाहणे अजूनही न्यू नॉर्मल नाही, चित्रपटगृहांत जाण्याची लोकांची इच्छा कायम असेल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फिल्म इंडस्ट्री पुन्हा चालेल. खरे तर धावू लागेल. येणाऱ्या दिवसांत आम्ही 100, 200, 300 कोटींच्या पुढे जात 400-500 कोटींची चर्चा करू.

2021 हे वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी कसे? यावर आम्ही आपल्याला प्रसिद्ध तज्ज्ञांचे मत सांगत आहोत. आतापर्यंत आपण अर्थव्यवस्था, शिक्षण, नोकरी आणि राजकारणावर लेख वाचले आहेत. मनोरंजन क्षेत्रासाठी 2021 हे वर्ष कसे असेल हे चित्रपट व्यवसाय विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांच्याकडून आज जाणून घेऊयात...

बॉलिवूड लोकांचे मनोरंजन करते. काही तासांसाठी का होईना, आपली सुख-दु:खे विसरण्यास भाग पाडते. पण, लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर याच बॉलिवूडची अशी हेटाळणी करण्यात आली, जसे काही जगातील सर्वांत गलिच्छ क्षेत्र हेच आहे. 2020 मध्ये आपल्या अभिनेते आणि निर्माते दिग्दर्शकांची जेवढी बदनामी झाली, तशी पूर्वी कधीही झाली नव्हती. या इंडस्ट्रीवर लावलेले जवळपास सगळे आरोप खोटे ठरले. पण, इंडस्ट्रीच्या सन्मानाची जी हानी झाली, ती महामारीमुळे झालेल्या पाच हजार कोटींच्या नुकसानापेक्षा कमी नाही.

...तर मोठे नुकसान झाले असते

ओटीटी प्लॅटफॉर्मवरून चित्रपट प्रदर्शित झाले नसते, तर लॉकडाऊनमध्ये आणखी नुकसान झाले असते. कारण तयार झालेल्या चित्रपटांवरील गुंतवणूक अडकून पडली असती आणि त्यावर नऊ महिन्यांचे व्याज लागले असते. प्रेक्षकांची अभिरुची बदलल्याने असे अनेक चित्रपट ‘जुने’ ठरले असते. पण, पुढेही लोकांना घरी बसून चित्रपट पाहायला आवडेल? हा ट्रेन्ड न्यू नॉर्मल हाईल? अजिबात नाही! लोक पुन्हा चित्रपटगृहांत जातील, कारण नऊ महिन्यांच्या सवयीमुळे आयुष्यभराची सवय बदलणार नाही. चित्रपट मोठ्या पदड्यासाठी बनतात. तसे नसते तर शाहरुख खानच्या ‘पठान’चे कथानक छोट्या पडद्यानुरूप बदलले गेले असते. चित्रपटगृहांत प्रेक्षकांची गर्दी होईल या अपेक्षेने रिलायन्स एन्टरटेन्मेंटने ‘सूर्यवंशी” आणि ‘83’ अशा बिग बजेट चित्रपटांच्या तीनशे-चारशे कोटींच्या गुंतवणुकीवरील कोट्यवधींचे व्याज भरले नसते.

महाराष्ट्र सरकारने पॅकेज द्यायला हवे

या वर्षी मोठ्या पडद्याबरोबरच ओटीटीसाठी वेगळा कंटेन्ट तयार होईल, कारण लोकांना ओटीटीच्या आहारी गेले आहेत. कोरोना महामारी कधी संपते आणि चित्रपटगृहात सूर्यवंशीसारखा धमाकेदार चित्रपट कधी प्रदर्शित होतो, यावर चित्रपट व्यवसाय कधी, किती आणि किती लवकर उभारी घेईल, हे अवलंबून असेल. सरकार चित्रपट उद्योगाला संजीवनी देण्यासाठी कुठलेही पॅकेज देत नाही, ही खेदाची बाब आहे. आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील चित्रपट उद्योगाचा गाडा रुळावर आणण्यासाठी पॅकेज दिले. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनेही तसा विचार केला पाहिजे.

कलाकार काम करत आहेत

मंदीच्या काळात चित्रपट उद्योगाला तेजी येते, असे म्हटले जाते. कारण लोक आपल्या समस्यांतून विरंगुळा मिळवण्यासाठी चित्रपट पाहतात. पण 2020 च्या मंदीने बॉलिवूडलाही सोडले नाही. नव्या वर्षात सारे काही ठीक होईल, अशी आशा आहे. बॉलिवूडविषयी लोकांच्या मनात असलेल्या आकर्षणामुळे ते पुन्हा उभारी घेईल. बड्या अभिनेत्यांनी लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत केली आणि करीत राहतील. सगळे नॉर्मल होत नाही, तोवर अशा अभिनेत्यांना आपल्या मानधनात कपात करावी लागली तरी ते मदत करीत राहतील. (तथापि, आतली बातमी अशी आहे, की काही अभिनेत्यांनी लॉकडाऊननंतर आपले मानधन वाढवले आहे). आपल्या अभिनेत्यांनी एक-दोन वर्षे कोणतेही चित्रीकरण केले नाही, तरी त्यांच्या आर्थिक स्थितीत फारसा फरक पडत नाही. असे असूनही आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंह, रणबीर कपूर, करीना कपूर (गर्भवती असतानाही), दीपिका पदुकोण, आलिया भट, शाहिद कपूर, वरुण धवन, टायगर श्रॉफ, सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल आणि इतर अनेक कलाकार चित्रीकरण करीत असतील तर ते प्रशंसनीय आहे.

बॉलिवूड नक्की उभारी घेईल

या 2021 मध्ये ‘राधे’ चित्रपटात सलमान खानचा शर्ट पुन्हा फाटताना पाहून चित्रपटगृहे टाळ्या शिट्ट्यांनी पुन्हा दणाणेल. ‘सूर्यवंशी’तील अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह यांचे वर्दीतील कारनामे बघून प्रेक्षक चेकाळतील. चित्रपटगृहाच्या अंधारात डोळे लाल होईपर्यंत लालसिंह चड्ढामधील आमीर खानसोबत रडतील. होय. फिल्म इंडस्ट्री पुन्हा चालेल. खरे तर धावू लागेल. कदाचित आगामी काळात चित्रपट असे चालतील की इंडस्ट्रीतील लोकही पाहात राहतील. 100, 200, 300 कोटींच्या पुढे जात आम्ही 400-500 कोटींची चर्चा करू. वर्षात 3500 कोटींऐवजी 4500 कोटींच्या व्यवसायावर बोलले जाईल. फक्त एक मोठा अन् सुपरहीट चित्रपट यायला हवा. आणि कोरोना जायला हवा.

बॉलिवूडविषयी तयार झालेली नकारात्मकता जावी... आणि असे होईल. नक्की होईल. बॉलिवूड परत उभारी राहील, जग त्याला परत उभे करेल. बॉलिवूडचा अस्तमान होऊ लागलेला सूर्य पुन्हा उगवेल. कदाचित ‘सूर्यवंशी’मुळे तसे घडेल!

बातम्या आणखी आहेत...