आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OTT रिलीज:विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंह’ने वळवला ओटीटीकडे मोर्चा, ऑगस्टमध्ये होणार रिलीज

किरण जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शूजितच्या मागील 'गुलाबो-सिताबो'पासून सुरू झाले होते थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचे ट्रेंड

अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘सरदार उधमसिंह’ सिनेमाने आता ओटीटीकडे पाऊल टाकले आहे. चित्रपटाचे शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनचे काम गेल्या वर्षीच पूर्ण झाले होते. खरं तर हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2020 रोजी रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे तसे होऊ शकले नाही. यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी याच वर्षी 15 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. अखेर निर्मात्यांनी हा सिनेमा आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर या वर्षी ऑगस्टमध्ये महिन्यात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • गुंतवणूक पाहता जास्त वाट पाहणे योग्य नाही

ट्रेड विश्लेषक अरुण मोहन सांगतात, शूजित सरकारने आपला ‘गुलाबो सिताबो’देखील ओटीटीवर रिलीज केला होता. असे करणारे ते पहिले दिग्दर्शक ठरले. त्यांनीच थिएटरमध्ये मोठ्या सिनेमांच्या प्रदर्शनाची चेन मोडली होती. त्यांचे हे डिजिटल वळण आमच्यासाठी फायद्याचे ठरले. अशात त्यांनी ‘सरदार उधम सिंह’ डिजिटलवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला असेल तर विचार करूनच घेतला असेल. गेल्या दोन वर्षांपासून टीम या सिनेमावर काम करत आहे. गेल्यावर्षीच तो प्रदर्शित होणार होता, मात्र तसे झाले नाही. आजची परिस्थिती पाहता पुढचे 6 महिन्यांपर्यंतदेखील थिएटर उघडण्याचे काही संकेत दिसत नाहीत. आपली गुंतवणूक पाहता निर्मात्यांचे जास्त वाट योग्य नाही.

  • शूजितने दिली नाही प्रतिक्रिया

सिनेमाच्या डिजिटल रिलीजवर आम्ही दिग्दर्शक शूजित सरकार यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. खरं तर विकी कौशलचा हा सिनेमा क्रांतिकारी सरदार उधम सिंह याचा बायोपिक आहे. त्यांनी ब्रिटिश इंडियाचे पूर्व लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायरची ब्रिटनमध्ये हत्या केली होती. जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी उधमसिंह यांनी हत्या केली होती. जनरल ओडवायरनेच या हत्याकांडाचा आदेश दिला होता आणि ते जनरल डायरने पूर्ण केले होते.

बातम्या आणखी आहेत...