आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओटीटी सुपरस्टार 2020:पंकज त्रिपाठीपासून ते दिव्येंदू शर्मापर्यंत, या बॉलिवूड स्टार्सनी यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजवले वर्चस्व

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणते तारे ओटीटी वर वर्चस्व गाजवत आहेत, ते पाहुया...

यावर्षी कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशभरातील चित्रपटगृहांना कुलूप लागले होते. दरम्यान, बॉलिवूड सेलिब्रिटींनी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम हाती घेतले. यापैकी काही कलाकार असेही आहेत ज्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये उत्कृष्ट कामगिरी करत बॉलिवूडनंतर या प्लॅटफॉर्मचा चेहरा बनले आहेत. कोणते तारे ओटीटी वर वर्चस्व गाजवत आहेत, ते पाहुया...

नवाजुद्दीन सिद्दीकी - 2018 मध्ये आलेल्या 'सेक्रेड गेम्स' या मालिकेत गणेश गायतोंडेच्या भूमिकेत दिसलेला नवाजुद्दीन सिद्दीकी हा नेटफ्लिक्सचा मुख्य चेहरा बनला आहे. हा अभिनेता बॅक-टू-बॅक ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसत आहे. नेटफ्लिक्सच्या सीरियस मॅन आणि रात अकेले ही मध्येही नवाजला लोकांनी पसंतीची पावती दिली. यासह हा अभिनेता जी 5 च्या घुमकेतू या चित्रपटातही दिसला आहे.

पंकज त्रिपाठी - बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे पंकज त्रिपाठी आता ओटीटी सुपरस्टार बनले आहेत. मिर्झापूर आणि मिर्झापूर 2 (अॅमेझॉन प्राइम) वेब सीरिजमध्ये कालीन भैयाची सशक्त भूमिका साकारल्यानंतर त्यांनी गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल (नेटफ्लिक्स) आणि लुडो (नेटफ्लिक्स) सारख्या डिजिटल चित्रपटातही सर्वांना प्रभावित केले. पंकज लवकरच क्रिमिनल जस्टिस 2 मध्ये वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दिव्येंदू शर्मा- प्यार का पंचनामा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा दिव्येंदू शर्मा बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसला होता. परंतु तो फारशी लोकप्रियता मिळवू शकला नाही. मात्र मिर्जापूरमध्ये मुन्ना भैय्या बनून या अभिनेत्याने लोकांची मनं जिंकली. अभिनेता आता ओटीटीचा प्रसिद्ध चेहरा झाला आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमच्या मिर्जापूर सीरिजनंतर तो आता झी 5 ची सीरिज बिच्छू का खेल आणि शुक्राणू या चित्रपटातही दिसला आहे.

अभिषेक बॅनर्जी- कास्टिंग डायरेक्टरहून अभिनेता बनलेल्या अभिषेक बॅनर्जीने स्त्री आणि ड्रीमगर्ल सारख्या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. 2020 मध्ये आलेल्या पाताल लोक या सीरिजमध्ये हथोडा त्यागीच्या व्यक्तिरेखेने या अभिनेत्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. मिर्झापूर सीरिजमध्ये अभिषेकने मुन्ना भैयाचा उजवा हात बनून देखील उत्कृष्ट अभिनयाची छाप सोडली आहे. या अगोदर तो ह्यूमरसली योर, टीवीएफ पिक्चर्स, टाइपराइटर, काली, परिवॉर आणि अनपॉस्ड अशा वेब मूव्हीज आणि सीरिजचा एक भाग होता. सध्या या अभिनेत्याकडे बॉलिवूडचे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत.

सुष्मिता सेन- 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनने 2020 मध्ये आर्य या वेब सीरिजमधून डिजिटल पदार्पण केले. डिजिटल डेब्यू व्यतिरिक्त या अभिनेत्रीने बर्‍याच दिवसानंतर अभिनयातही पुनरागमन केले. ही पहिली फिमेल लीड सीरिज होती, जिला नेटफ्लिक्सवरील प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या यशस्वी सीझननंतर लवकरच सुष्मिता आर्य 2 मध्ये दिसणार आहे.

किर्ती कुल्हारी - पिंक, इंदू सरकार आणि उरी सारख्या चित्रपटात झळकलेली किर्ती कुल्हारी आता वेब सीरिज आणि वेब सिनेमांतही खूप नाव कमावत आहे. फोर मोर शॉट्स आणि बार्ड
ऑफ ब्लड सीरिजनंतर किर्ती लवकरच क्रिमिनल जस्टिस बिहाइंड क्लोज डोरमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बॉबी देओल- पोस्टर बॉय आणि रेस 3 सारख्या ब-याच फ्लॉप चित्रपटांचा एक भाग राहिलेल्या बॉबी देओलचे ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र खूप कौतुक होत आहे. हा अभिनेता बर्‍याच दिवसानंतर नेटफ्लिक्सची ओरिजिनल फिल्म क्लास ऑफ 83 मध्ये लीड रोलमध्ये झळकला. याशिवाय, एमएक्स प्लेयरच्या आश्रम या सीरिजमधील अभिनयाबद्दलही बॉबीचे खूप कौतुक झाले.

बातम्या आणखी आहेत...